आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Editing नव्हे, खरेखुरे आहेत हे फोटो! जगातील सर्वात स्टायलिश श्वान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - बोधी नाव असलेला हा डॉगी जगातील सर्वात स्टायलिश श्वान म्हणून प्रसिद्ध आहे. शिबा ईनू ब्रीडचा हा श्वान प्रत्यक्षात मेन्स वेअर फॅशन क्षेत्रात एक सुपरमॉडेल आहे. याचा एक फोटो पाहून कुणीही पुन्हा-पुन्हा पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. त्याच गोष्टीने बोधी आता एक स्टार बनला आहे. तो न्यूयॉर्कमध्ये आपली मम्मी (मालकीन - येना किम) हिच्यासोबत राहतो.

 

जोक म्हणून केली होती सुरुवात, बनला सुपरस्टार
येना किम यांनी आपल्या युवा आणि फोटोजेनिक लुक्स असलेला श्वान बोधीला अशाच एकेदिवशी ड्रेस अप केले. त्याला राल्फ लॉरेन नावाच्या मेन्स वेअर ब्रॅन्डचे कपडे घातले आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. लोकांना तो इतका आवडला की तो एका रात्रीत स्टार बनला. यानंतर जे काही घडले ते इतिहासच... असे त्याच्या मम्मीने सांगितले आहे. त्याची मम्मी येना किम यांना मालकीन बोललेले आवडत नाही. सोशल मीडियावर या श्वानाचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. तसेच या अकाउंटवर त्याचे तब्बल 3.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 


पुढे, पुन्हा-पुन्हा पाहावेसे वाटतील असे बोधीचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...