आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

39 जणांचा जीव घेणाऱ्या Serial Killer ची कबुली; सांगितले धक्कादायक कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या इतिहासातील सर्वात कुख्यात सीरियल किलर म्हणूनही ओळखला जाणारा तिएगो हेनरिकने 39 जणांचा खून केला आहे. त्याला जगातील सर्वात कुप्रसिद्ध सायको सीरियल किलर्सपैकी एक मानले जाते. केवळ आपल्या बेचैन मनाला शांती आणि असुरी आनंद मिळावा यासाठी त्याने ज्यांना ओळखतही नाही त्यांना ठार मारले आहे. 


लहानपणी झाले होते लैंगिक शोषण
थिएगो अगदी लहान होता, तेव्हा त्याचे लैंगिक शोषण झाले होते. या घटनेनंतर तो डिप्रेशनमध्ये गेला. मोठा झाल्यानंतरही तो मानसिक तणावातच होता. क्षुल्लक गोष्टींवरून तो कुणाशीही भांडायचा. मोठा झाला तेव्हा, त्याला सिक्यॉरिटी गार्डची नोकरी मिळाली. तेव्हा सुद्धा काहीच सुधारणा झाली नाही. तो लोकांना मुद्दाम अडवायचा. वाद सुरू करून त्यांना मारहाण देखील करायचा. 


असा बनला सीरियल किलर...
> आपला मानसिक ताण कमी करण्यासाठी त्याने जो मार्ग निवडला तो सर्वात धक्कादायक होता. त्याने सर्वप्रथम रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसावर अचानक हल्ला करून त्याला ठार मारले. तसेच घटनास्थळावरून पसार झाला. 
> यानंतर तो रात्री बेरात्री बाइकवर जाताना गल्ली-बोळात फिरायचा आणि कुणीही एकटे दिसल्यास जोरात ओरडायचा 'रॉबरी...' यावर समोरील व्यक्ती जेव्हा अॅलर्ट व्हायचा त्याचवेळी तो त्याला गोळ्या घालून ठार मारायचा. 


"सुंदर मुलींना मारण्यात मज्जा वाटायची..."
2014 मध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी तो बनावट नंबर प्लेटसह पकडल्या गेला होता. यानंतर त्याने पोलिसांसमोर 39 खून केल्याची कबुली दिली. लोकांना ठार मारताना तो सर्वप्रथम सुंदर तरुणींचा शोध घ्यायचा. त्याने मारलेल्या पीडितांपैकी बहुतांश तरुणीच होत्या. विशेष म्हणजे, तो लोकांना फक्त ठार मारायचा. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची लूट त्याने केलेली नाही. सुंदर तरुणींना ठार मारण्यात अधिक मज्जा वाटायची अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. या सर्वांना ठार मारून आपल्याला मानसिक शांती लाभत होती असे त्याने सांगितले. 


2014 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न
आपल्या कृत्यांमुळे कैदेत असलेल्या थिएगोने 2014 मध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने तुरुंगातील खोलीत लावलेला विजेचा बल्ब फोडला आणि त्याच्या काचेपासून आपल्या हाताच्या शिरा कापल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...