आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी व्लादिमीर पुतीन यांची हाक! रशियात निवडणुकीचा बिगुल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- रशियाला आता मार्चमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष  व्लादिमीर पुतीन नवीन कारकीर्दीसाठी इच्छुक आहेत. देशाची आधुनिक अर्थव्यवस्था तयार करण्याचा माझा भविष्यात प्रयत्न असेल. त्यासाठी मला पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा पुतीन यांनी व्यक्त केली. गुरुवारी वार्षिक पत्रकार परिषदेतून त्यांनी ही भूमिका जाहीर केली.   रशियाच्या अर्थव्यवस्थेला अधिक लवचिक करणे आणि अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा योग्य वापर करणे यासाठी भविष्यातील संधीचा उपयोग केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. देशात राजकीय खुलेपणा यावा यासाठी राजकीय स्पर्धा कशी निर्माण होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे, असे ते म्हणाले. 

 

आश्वासने अशी

निवडून आल्यास आरोग्य क्षेत्र, शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन पुतीन यांनी दिले आहे.  


वैयक्तिक घोषणा 

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मी इच्छुक आहे. या पदासाठी माझ्या उमेदवारीची घोषणा वैयक्तिक स्वरूपाची आहे. स्वयंघोषित आहे. त्याचा युनायटेड रशिया या पक्षाशी काही संबंध नाही, असे पुतीन यांनी स्पष्ट केले.  

बातम्या आणखी आहेत...