आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनोचा चमू पाकिस्तानात जाणार, हाफिजबाबतचे वास्तव तपासणार; भारत-USच्या दबावामुळे चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद प्रकरणात अमेरिका आणि भारताने पाकिस्तानवरील दबाव वाढवला अाहे. त्याचाच भाग म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा चमू गुरुवारपासून (२५ जानेवारी) पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्यांचा हा दोनदिवसीय दौरा असेल. त्यात हा चमू हाफिजच्या संघटनेबाबतचे वास्तव तपासून पाहणार आहे.


जागतिक संस्थेचा हा चमू २५ व २६ रोजी पाकिस्तानात राहणार आहे. त्यादरम्यान हे अधिकारी पाकिस्तान सरकारकडे हाफिझ सईदवरील कारवाईबाबत विचारणा करतील. त्याचबरोबर सरकारची मानसिकता लक्षात घेऊन पुढील दिशा ठरवू शकतात. दुसरीकडे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मात्र हा नियमित दौरा असल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्त्या हिदर नॉर्ट म्हणाल्या, हाफिझव संपूर्ण ताकदीने खटला चालवावा, असे स्पष्ट केले होते.


सईद फाउंडेशनचा प्रवेश स्टॉक मार्केटमध्ये शक्य
पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये हाफिज सईदची संघटना फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनची नोंदणी करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यास भारत व अमेरिकेने विरोध केला.


सईद व संघटनांवर संयुक्त राष्ट्राची ९ वर्षांपासून नजर
सुरक्षा परिषदेने २००८ मध्ये मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिजच्या विरोधात विधेयक मंजूर केले होते. त्याच्या जमात-उद-दावाला २०१४ मध्ये दहशतवादी संघटना घोषित केले होते. सईदला ९ महिने नजरबंद केल्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आले . हाफिज फलाह-ए- इन्सानियत नावाने आणखी एक संघटना चालवतो.


रक्तरंजित होळी खेळू नका, काश्मीरला आखाडा बनवू नका : मेहबूबा मुफ्ती 
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करू लागला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात आतापर्यंत ५ जवान शहीद झाले आहेत तर ६ नागरिकांचा मृृत्यू झाला. या दरम्यान मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सीमेवरील तणाव संपावा यासाठी भावनिक आवाहन केले आहे. आपल्या सीमेवर सध्या रक्ताचे पाट वाहू लागले आहेत. ही रक्तरंजित होळी तत्काळ थांबवा. देशाने विकासाचे मार्गाने वाटचाल करावी, असे पंतप्रधान सांगतात. राज्यात त्याच्या उलट होत आहे. मी पंतप्रधान व पाकिस्तानला आवाहन करते. त्यांनी जम्मू-काश्मीरला युद्धभूमी बनवू नये. मैत्रीचा सेतू तयार करा. रविवारी पाेलिस कॉन्स्टेबलच्या पासिंग आऊट परेडदरम्यान मेहबूबा यांनी मार्गदर्शन केले. गेल्या काही दिवसांपासून पाकचे सैनिक गोळीबार करत आहेत.


गरज पडल्यास सीमेपलीकडे घुसून शत्रूंवर हल्ला : राजनाथ सिंह
गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, भारत आता बलशाली राष्ट्र आहे. गरज पडली तर सीमेपलीकडे जाऊन शत्रूला ठार केले जाऊ शकते, हे भारताने जगाला पूर्वीच दाखवून दिले आहे. राजनाथ लखनऊमध्ये रेल्वे माल गोदाम श्रमिक संघाच्या अधिवेशनात बोलत होते