आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मायक्राेसाॅफ्ट,अायबीएमचे चेहरा अाेळखणारे तंत्रज्ञान अयशस्वी;श्वेतवर्णीयांचेच चेहरे व्यवस्थित अाेळखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅसाच्युसेट्स- माेबाइल फाेन व अनेक गॅजेट्समध्ये वापरले जाणारे चेहरा  अाेळखणारे तंत्रज्ञान अचूकतेच्या कसाेटीवर अयशस्वी झाले अाहे. हे तंत्रज्ञान श्वेतवर्णीयांना सहज अाेळखते; परंतु कृष्णवर्णीयांना अाेळखण्यात खूपच कमी पडत अाहे. फेस रिक्गनिशन म्हणजे चेहरा अाेळखण्याच्या तंत्रज्ञानाचा माेबाइल फाेनला लाॅक-अनलाॅक करण्यासाठीही वापर हाेताे. अाॅटाेइंटेलिजन्सवर अाधारित हे फीचर माेबाइल वा तत्सम उपकरणांच्या मालकाची चेहरेपट्टी अापल्या डेटाबेसमध्ये साठवून ठेवते व ताे चेहरा पुन्हा दिसल्यास माेबाइल अनलाॅक करते. हे फीचर उपकरणाची सुरक्षितता नजरेसमाेर ठेवून तयार करण्यात अाले हाेते; परंतु अाता अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स येथील एमअायटी मीडिया लॅबच्या अचूकता चाचणीत या तंत्रज्ञानावर वंशभेदी असल्याचा अाराेप करण्यात अाला अाहे.


या लॅबने चेहरा अाेळखण्याच्या फीचरची अचूकता तपासण्यासाठी काही चाचण्या घेतल्या. त्यात एक हजार २७० चेहऱ्यांचा समावेश करण्यात अाला. एवढ्या नागरिकांच्या चेहऱ्यांचा डेटाबेस फेस रिक्गनिशन तंत्रज्ञानात टाकण्यात अाला. मात्र, पुन्हा चेहरा अाेळखण्याची चाचणी घेण्यात अाल्यावर हे तंत्रज्ञान फेल गेले. श्वेतवर्णीयांचे चेहरे अाेळखण्यात त्याची अचूकता ९६ %, तर कृष्णवर्णीयांचे चेहरे अाेळखण्यात हा दर २३.५ % इतका राहिला. या चाचणीत मायक्राेसाॅफ्ट व अायबीएमसारख्या दिग्गज कंपन्यांचे चेहरा अाेळखण्याचे तंत्रज्ञानही अयशस्वी ठरले. हे तंत्रज्ञान अशा प्रकारे अचूकतेच्या कसाेटीवर खरे न उतरू शकल्याची ही पहिलीच वेळ अाहे. त्यामुळे संपूर्ण अाॅटाेइंटेलिजन्सच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. परिणामी, अाम्हास अशा प्रकारच्या फीचरसाठी डेटाबेस तयार करताना सावधगिरी बाळगावी लागेल, असे चाचणी घेणाऱ्या पथकातील संशाेधक जाॅय बुलाविमी यांनी सांगितले.

 

या समस्येमुळे अाराेग्य व कायदा क्षेत्रातही हाेऊ शकते नुकसान

ही निश्चितपणे तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली समस्या अाहे; परंतु या समस्येवर लवकरात लवकर उपाय शाेधावा लागेल. माेबाइल व इतर गॅजेट्सशिवाय या तंत्रज्ञानाचा वापर अाराेग्य क्षेत्र व गुन्हेगारांना अाेळखण्यासाठीही माेठ्या प्रमाणावर केला जाताे. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या या चुकीचा गैरफायदा वाईट प्रवृत्तीच्या लाेकांना हाेऊ शकताे, अशी भीती एमअायटी मीडिया लॅबचे संशाेधक जाॅय बुलाविमी यांनी वर्तवली अाहे.

बातम्या आणखी आहेत...