आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांनी जवळून पाहावे यासाठी अाॅलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियन रस्त्यावरच्या ट्रॅकवर धावतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - सर्वाधिक व्यग्र असणाऱ्या मँचेस्टर शहरातील महत्त्वाचे रस्ते  अाता पाच दिवसांसाठी बंद राहणार अाहेत. ही कल्पनाच इतरांसाठी अप्रूप वाटणारी अाहे. मात्र, हे वृत्तही सत्य अाहे. कारण याठिकाणच्या रस्त्यावरून अाता जगातील अव्वल दर्जाचे धावपटू धावताना दिसणार अाहेत. त्यासाठी या रस्त्यावरच दर्जेदार ट्रॅक तयार करण्यात अाला.   


इंग्लंडच्या मँचेस्टर शहरामध्ये अशा प्रकारची स्पर्धा अायाेजित केली जाते. ग्रेट सिटी गेम्स नावाने ही स्पर्धा हाेते. ही जगातील एकमेव अॅथलेटिक्स मीट अाहे, ज्यामध्ये अाॅलिम्पिक अाणि वर्ल्ड चॅम्पियन धावपटू हे रस्त्यावर धावतात. त्यामुळे येथील चाहत्यांना हे दिग्गज धावपटू जवळून पाहण्याची संधी मिळते. तसेच हे चाहते या सर्वांसाेबत संवादही साधतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही माेठी पर्वणी असते. शुक्रवारी मँचेस्टरच्या डिंसगेट रस्त्यावरील या स्पर्धेमध्ये जगातील काही धावपटूंनी सहभाग घेतला. 

 

बातम्या आणखी आहेत...