आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • These 5 Steps Will Help You To Get A Credit Card, Business And Personal Finance Tips

बँक देत नाही क्रेडिट कार्ड? Follow करा या 5 महत्वाच्या Steps

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - कित्येकवेळा पैशांची गरज असताना आपल्या अकाउंटमध्ये काहीच राहत नाही. महिन्याची 20 तारीख गेल्यानंतर कॅशची चण-चण हा अनुभव कदाचित प्रत्येक नोकरीपेशा व्यक्तीला असेल. अशात क्रेडिट कार्ड खूप महत्वाचे ठरतात. पैश्यांमुळे कुठलेही आवश्यक काम थांबत नाही. त्यावरून घेतलेले पैसे आपण ठराविक दिवसांनंतर परतफेड करताना व्याज सुद्धा लागत नाही. या कार्डवरून फक्त ऑनलाइन पेमेंटच नव्हे, तर ठराविक कॅश सुद्धा काढता येतो. 


अनेक बँका क्रेडिट कार्ड देण्यासाठी ऑफर लाँच करतात. पण, बऱ्याच लोकांसाठी क्रेडिट कार्ड मिळवणे हे काही सोपे नाही. कित्येक लोकांचे अॅप्लिकेशन रिजेक्ट केले जातात. तर काहींना बँक विविध कारणे दाखवत क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतात. बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे, यास काही कारणे आहेत. पण, महत्वाच्या स्टेप्स फॉलो केल्यास आपल्याला क्रेडिट कार्ड घेता येईल. त्या 5 स्टेप पुढीलप्रमाणे आहेत.
 

नो-फ्रिल्‍स कार्डने करा सुरुवात
आपण पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेत असला तर एक बेसिक किंवा कुठलीही वार्षिक फी नसलेल्या क्रेडिट कार्डने सुरुवात करावी. त्यालाच नो फ्रिल्‍स कार्ड असे म्हटले जाते. हा एक कमी कॅश आणि क्रेडिट लिमिट असलेला कार्ड असतो. सुरुवातीलाच अधिक लिमिट किंवा प्रीमियम कार्ड घेण्याचा विचार करू नये. यासाठी आपला इनकम लेव्हल अधिक असणे आवश्यक आहे. सोबतच त्याची फी सुद्धा अधिक आकारली जाते. पहिले क्रेडिट कार्ड घेऊन आपली क्रेडिट हिस्ट्री मजबूत करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून सहजपणे आपल्याला प्रीमियम कार्ड घेण्यास पात्र मानले जाईल.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर 4 महत्वाच्या स्टेप...

 

बातम्या आणखी आहेत...