आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट भारतात विमानसेवा देणार ही एअरलाइन्स, बिकिनी एअरहोस्टेससाठी प्रसिद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - बिकिनी एअरहोस्टेस आणि बिकिनी एअर शो साठी जगभर ओळखल्या जाणारी वादग्रस्त एअरलाइन्स आता भारतात येणार आहे. वियतनाममध्ये चालणाऱ्या या एअरलाइन्सचे नाव विएतजेट असून त्यांनी हो ची मिन्ह शहरातून थेट दिल्लीत विमान आणणार अशी योजना केली आहे. सीएन ट्रॅव्हेलरच्या वृत्तानुसार, सर्व काही सुरळीत राहिल्यास याच वर्षाच्या शेवटी ही विमाने भारतात येतील. 

 

बिकिनीच्या कल्पनेने अब्जाधीश बनली महिला सीईओ
वियतनामच्या न्युयेन थी फ्वोंग थाओ सध्या विएतजेट नामक एअरलाईन्स कंपनीच्या सीईओ आहेत. त्यांच्या कंपनीची कमाई 180 कोटी डॉलर अर्थातच 11700 कोटी रुपये एवढी आहे. आपल्या विमानांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी बिकीनी एअरहोस्टेसची संकल्पना मांडली. हीच संकल्पना त्यांच्या विमान कंपनीचे वैशिष्ट्य बनले. त्यांच्या फ्लाइटमध्ये सर्वच एअरहोस्टेस चक्क बिकीनीमध्ये असतात.

 

महिला आहे सीईओ
विशेष म्हणजे, थाओ आपल्या विमानाच्या सेवा महागडी तिकीटे घेणाऱ्यांसाठी नाही, तर बजेटवर भर देणाऱ्या विमान प्रवाश्यांसाठी सुरू केली. समस्त आशिया खंडातील 47 शहरांमध्ये त्यांच्या विमानसेवा आहेत. विएतजेट आपल्या एयरहोस्टेसच्या पेहरावामुळे जेवढी चर्चेत आहे, तेवढीच वादात देखील आहे. नुकतेच त्यांच्या एका विमानात एयरहोस्टेसेसने बिकीनी डान्स केला होता. यानंतर देशभर वादंग उठला. सरकारने तर, या कंपनीच्या एयरहोस्टेसला यापुढे संपूर्ण कपडे घालण्याचे निर्देश दिले.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, बिकिनीच्या आयडियाने अशी बनली अब्जाधीश...

बातम्या आणखी आहेत...