आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे बापरे! या मुलाला दरमहा येते मासिक पाळी, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत राहणारा कॅस क्लेमर वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत पुरुषाची लाइफ जगत होता. त्याची छाती सपाट होती. तो व्यायाम करायचा, धावायचा आणि सामान्य लाइफ जगायचा. मग, अचानक त्याची मासिक पाळी सुरू झाली. या घटनेने त्याचे आयुष्य बदलले. गेल्या 4 वर्षांपासून त्याला नियमित पीरियड्स येतात. त्यामुळे, दरमहा 5 दिवस तो पुरुषाचा स्त्री होतो. तो एक ट्रान्सजेंडर आहे. केवळ महिलांनाच पीरियड्स येतात हा लोकांचा गैरसमज आहे. ट्रान्सजेंडर आणि फेमिनाइन लोकांना सुद्धा मासिक पाळी येते असा तो सध्या प्रचार करतोय. तसेच सोशल मीडियावर कॅम्पेन चालवून आपल्यासारख्याच इतर ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी झटत आहे. 

 

> कॅस क्लेमरने सोशल मीडियावर 'टोनी द टॅम्पून' नावाचा कॅरेक्टर तयार केला आहे. याच कॅरेक्टरच्या माध्यमातून तो विविध फोटोज पोस्ट करून आपल्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कासाठी जनजागृती करत आहे. 
> केवळ महिलांनाच मेनस्ट्रुअल सायकलला सामोरे जावे लागते हा समाजात रूढ झालेला गैरसमज आहे. ट्रान्सजेंडर आणि फेमिनाइन हार्मोन्सच्या लोकांना सुद्धा मासिक पाळी येते हे लोकांना माहितीच नाही. 
> महिलांसाठी वेगळे बाथरूम प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी वेगळ्या डस्टबिन आणि इतर सुविधा देखील केलेल्या आहेत. पण, आमच्यासारख्या ट्रान्स लोकांना पुरुषांच्याच टॉयलेटमध्ये जावे लागते. मुळात, लोक मान्य करायला तयारच होत नाही की महिलांप्रमाणेच ट्रान्स समुदायाला सुद्धा अधिकारांची नितांत गरज आहे. 
> समाजात पीरियड किंवा मासिक पाळी हा शब्द सार्वजनिक ठिकाणी वापरला जात नाही. त्यावर जाहीर चर्चा सुद्धा केली जात नाही. त्यातही ट्रान्स समुदायाच्या पीरियड्सवर कुणी बोलायलाच तयार होत नाही अशी तक्रार तो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर करतो. 
> माझेच उदाहरण, घ्या मी महिला नाही तरीही मला मासिक पाळी येते. दरमहा 5 दिवस मी स्त्री होतो. ते 5 दिवस खूप त्रासदायक असतात. पण, माझ्याशी त्यावर कुणीही चर्चा करत नाही. किमान लोकांनी आमच्या समुदायाला सन्मान तरी द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. 

 

ट्रान्सजेंडर म्हणजे नेमके काय?
जन्मजात काही लोक न कळणारे लिंग घेऊन येतात. त्यापैकी काही लोक शस्त्रक्रिया करत नाहीत. तर काही वयात आल्यानंतर आपल्या पसंतीनुसार लिंग निवडून शस्त्रक्रिया करतात. काहींच्या बाबतीत ते पुरुष किंवा स्त्री म्हणून जन्माला आले, तरीही मानसिकरीत्या ते विरुद्धलिंगी असतात. त्यांना आपण चुकीच्या शरीरात जन्मलो असा भास होतो. काही लोक विरुद्धलिंगाची ड्रेसिंग करतात. त्यांना सुद्धा लोक ट्रान्सजेंडर असे संबोधतात. ट्रान्सजेंडर हे पुरुष किंवा स्त्री हे दोन्ही नसतात. त्यांना उभयलिंगी असेही म्हटले जाते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर कॅसच्या मोहिमेचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...