आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही कंपनी म्हणते, Boss ला डेट करा अन् 67 लाख पगाराची नोकरी मिळवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - नोकरी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला काय करावे लागते. त्याला आपल्या कामाबद्दलचे नॉलेज असणे आणि आत्मविश्वास सर्वात महत्वाचा असतो. पण, अशाही काही नोकऱ्या आहेत, ज्या करण्यासाठी उमेदवाराला आपल्या बॉसला डेट करावे लागणार आहे. अमेरिकेतील एका कंपनीने आपल्याकडे येणाऱ्या उमेदवारांसमोर ही अट ठेवली आहे. डेटिंग अॅप Hinge ने आपल्या कंपनीत नोकरीसाठी उमेदवारांचे अर्ज मागवले. त्या जॉबसाठी उमेदवारांना 67 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली. परंतु, जॉब मिळवणे वाटते तितके सोपे नाही.


- डेटिंग अॅपमध्ये पगार 67 लाख रुपये वार्षिक राहणार आहे. सोबतच, नियुक्ती झालेल्या उमेदवाराला हॉटेल आणि इतर भत्ते सुद्धा वेगळे दिले जातील. 
- अॅन्टी रिटेंशन स्पेशलिस्ट असे या पदाचे नाव असून त्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला आपल्या बॉससोबत डेटवर जावे लागणार आहे. या डेटमध्ये असताना आपण कंपनी सर्वाधिक ग्रो करू शकतो आणि जास्तीत जास्त बिझनेस देऊ शकते हे बॉसला पटवून द्यावे लागणार आहे. 
- हे पद रिलेशनशिप एक्सपर्टप्रमाणे आहे. येथे त्या व्यक्तीला समस्यांचे निराकरण, डेट फिक्स करणे, डेटसाठी परफेक्ट लोकेशन शोधणे आणि आपल्या क्लाइंट्ससोबत चांगले संवाद प्रस्थापित करण्याचे काम करावे लागेल. 
- 'हिंज' कंपनीच्या कम्युनिकेशन डायरेक्टर जीन मॅरी मॅग्राथ यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या कंपनीत बोलण्यापेक्षा करून दाखवण्यास प्राधान्य दिले जाते. जो कुणी बॉससोबत डेट करून यशस्वी ठरेल त्याला कंपनी चांगला पगार आणि भत्ते देणार आहे. 
- या जॉबसाठी उमेदवाराकडे समाजशास्त्र विषयात पीएचडी असणे आवश्यक आहे. सोबतच, रिलेशनशिप आणि सेक्स अशा विषयांवर संशोधन करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाईल.
- हिंज एक डेटिंग अॅप असून त्यांचे सर्वात मोठे स्पर्धक टिन्डर, बंबल आणि फेसबूक आहेत. सुरुवातीलाच या कंपनीने चांगली ग्रोथ दाखवली आहे.

बातम्या आणखी आहेत...