आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनच्या शाही घराण्यात असा ठरवला जातो वारसदार, येथे सविस्तर जाणून घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराणी एलिझाबेथ यांचे थेट वारसदार प्रिन्स चार्ल्स - Divya Marathi
महाराणी एलिझाबेथ यांचे थेट वारसदार प्रिन्स चार्ल्स

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटिश राजघराण्याच्या डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलटने आपल्या तिसऱ्या अपत्याला सोमवारी जन्म दिला. केन्सिंगटन पॅलेसने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, तो एक राजकुमार आहे. नवीन राजकुमार जन्माला येताच शाही तख्ताचा आणि महाराणी एलिझाबेथ यांचा 5 वा वारसदार ठरला आहे. त्याने आपले काका प्रिन्स हॅरी यांची जागा घेतली. पण, ब्रिटनच्या शाही परिवारात वारसदार नेमका कसा ठरवला जातो, याची सविस्तर माहिती divyamarathi.com आपल्याला देत आहे. 

 

असा ठरवला जातो वारसदार
> 92 वर्षीय महाराणी एलिझाबेथ यांच्याबद्दल भविष्यात काही अनपेक्षित घडल्यास त्यांचा वारसदार कोण राहील, यासाठी 10 जणांची यादी तयार ठेवण्यात आली आहे. यादीत सर्वात वर महाराणीचे ज्येष्ठ राजपुत्र चार्ल्स यांचे नाव आहे. 
> ब्रिटनच्या राजघराण्यात महाराणी किंवा महाराजाचा वारसदार ठरवण्यासाठी त्यांच्या ज्येष्ठ राजपुत्र किंवा पुत्रीला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे, प्रिन्स चार्ल्स महाराणी एलिझाबेथ यांचे थेट वारसदार ठरले आहेत. या कायद्यात वेळोवेळी बदलही केले जाऊ शकतात.
> महाराणी किंवा महाराजा अर्थातच मोनार्कच्या ज्येष्ठ पुत्रानंतर त्यांच्या कनिष्ठ पुत्र-पुत्रींचा क्रमांक लागतो. अशात सर्वात ज्येष्ठ पुत्राने विवाह केल्यास त्याची पत्नी ही दीराची जागा घेते. 
> ड्यूक ऑफ केम्ब्रिज विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांच्या लग्नानंतर असेच काही घडले होते. केट विवाह करून शाही घराण्यात आल्या, तेव्हा त्यांनी आपले दीर प्रिन्स हॅरी यांची जागा घेतली. 
> यानंतर ज्येष्ठ राजपुत्राला अपत्य झाल्यास त्या वारसदाराची पत्नी किंवा पती वारसदार राहत नाही. ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांच्या बाबतीत असेच घडले होते. प्रिन्स चार्ल्स यांच्या जन्मानंतर फिलिप यादीतून बाहेर झाले, कारण त्यांच्या पत्नी महाराणी होत्या. 
> केट मिडलटन यांनीही जेव्हा जॉर्ज आणि शार्लोटला जन्म दिला. तेव्हा केट बाहेर पडल्या आणि त्यांच्या अपत्यांनी यादीत प्रवेश केला. कारण, थेट वारसदार आणि ब्लडलाइनच्या बाबतीत विल्यम यांचे पारडे जड होते. त्यानुसारच केट यांचे तिसरे अपत्य जन्माला आले, तेव्हा त्या मुलाने आपले काका प्रिन्स हॅरींची जागा घेतली. 
> हॅरी सध्या 6 व्या क्रमांकावर आहेत. यानंतर 7 पासून पुढच्या 10 क्रमांकाच्या वारसदारांमध्ये प्रिन्स हॅरी यांचे काका आणि महाराणी एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र आहेत. अशात हॅरी यांनी विवाह केल्यास त्या काकांची जागा हॅरींच्या पत्नी घेऊ शकतात.

 

पुढील स्लाइडवर वाचा, अशी आहे सध्याची क्रमवारी...

बातम्या आणखी आहेत...