आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - चौथ्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल भरपूर दंतकथा आहेत. मोजक्याच खऱ्या असल्या तरीही त्या रशियात सर्वत्र प्रचलित आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, पुतिन आपले सेक्स पॉवर वाढवण्यासाठी हरणांच्या रक्ताने अंघोळ करतात. स्थानिक टीव्ही चॅनेल ‘कॅपिटलिस्ट टीव्ही’ ने राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबाबत हा खुलासा केला. त्यांच्या या विचित्र अंघोळीसाठी हरणांच्या शिंगातून काढलेले 70 किलो रक्त आणले जाते असेही सांगण्यात आले आहे.
- सायबेरियातील अतलाई पर्वताच्या आसपास हरणांची संख्या मोठी आहे. त्यांचे रक्त सेक्स पॉवर वाढविण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो.
- याबाबत दावा केला जातो की, या हरणांच्या शिंगातील रक्ताने केवळ अनेक आजारच बरे होत नाहीत तर सेक्स क्षमता वाढते.
- येथे त्यांचे अनेक फॉर्म हाऊस बनवली गेली आहेत. त्याच फॉर्म हाऊसमध्ये स्लाटर हाऊस सुद्धा आहेत.
- या स्लाटर हाऊसमध्ये जीवंत हरणांची शिंगे धारदार शस्त्राने कापली जातात.
- यानंतर त्या शिंगातून पडणारे रक्त बाटलीत भरले जाते. याशिवाय शिंगापासून पावडरही बनविली जाते.
- हे रक्त सेक्स पॉवर वाढविण्यासाठी वापरले जात असल्याने या रक्ताला ‘व्हायग्रा ब्लड’ असेही म्हटले जाते.
- याबाबत सांगितले जाते की, या रक्तामुळे महिला चिरतरूण दिसतात व त्यांचे तारूण्य बरेच काळ टिकते.
- हरणाच्या शिंगातील रक्ताला दहा ग्रॅमसाठी हजारो डॉलर मोजावे लागतात. याची खूपच मागणी असते.
- या ब्लडची सर्वाधिक मागणी दक्षिण कोरिया आणि अन्य आशियाई देशांत आहे.
भूलशिवाय (एनेस्थेटिकशिवाय) केली जाते क्रूरता
- हरणांचे शिंगे कापण्यासाठी यासाठी रितसर चेंबर व दावण बनवली जाते. जेथून ते हरिण हलूही शकत नाही.
- ही हिंसा, क्रूरता करण्याआधी हरणाला एनेस्थेसिया सुद्धा दिला जात नाही.
- शिंग कापताना हरण शुद्धीत असते व शिंग कापताना किंचळण्याशिवाय व विव्हळण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय राहत नाही.
- यानंतर हरणाच्या कापलेल्या शिंगाच्या भागावर पट्टी बांधली जाते. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा शिंगे फुटू लागतात.
- कापलेल्या शिंगाचे तुकडे सुद्धा विकले जातात. दावा केला जातो की, हरणाच्या शिंगातही सेक्स पॉवर वाढविण्याची क्षमता असते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सायबेरियात असे काढले जाते हरणांच्या शिंगांतून रक्त...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.