आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावरून (चीन दौरा) सध्या चर्चेत आहेत. 2011 मध्ये त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हापासून पहिल्यांदाच ते उत्तर कोरिया सोडून बाहेर आले आहेत. जगातील कुख्यात हुकूमशहांमध्ये किम जोंग उनचे नाव घेतले जाते. जगभर तानाशहा किंवा सुप्रीम लीडर म्हणून ओळख असली तरीही त्यांच्यासोबत शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांनी काही किस्से सांगितले आहेत.
परदेशात नाव बदलून शिक्षण
- किम जोंग उन यांचा जन्म 1982 मध्ये झाला होता असा काही माध्यमांचा दावा आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटकडे किम यांचा जन्म 8 जानेवारी 1984 रोजी झाल्याची नोंद आहे.
- किम यांचे शालेय शिक्षण स्वित्झरलंच्या कोरियन दूतावासातील स्टाफचा मुलगा म्हणून झाले. इंग्लिश मीडियम असलेली आंतरराष्ट्रीय शाळा बर्न जवळ गुमलीगेन येथे आहे.
- किमसोबत शिकणाऱ्या एका माजी विद्यार्थ्याने सांगितल्याप्रमाणे, किम वर्गात अतिशय सादा-भोळा विद्यार्थी होता. तरीही त्याच्याकडे चांगली विनोदी वृत्ती होती.
- माजी क्लासमेट मायक्रो इम्होफने सांगितल्याप्रमाणे, किम अतिशय विनोदी स्वभावाचा मुलगा होता. तो नेहमीच थट्टा-मस्करी करायचा. सर्वांसोबत चांगला वागत होता. शत्रू देशांतील विद्यार्थ्यांसोबतही अगदी चांगला राहायचा.
- दुसऱ्या एका क्लासमेटने जर्मन न्यूजपेपर वेल्स एम सॉनटॅगला सांगितले, पॉलिटिक्स स्कूलमध्ये एक अघोषित बॅन केलेला विषय होता. लोक फक्त फुटबॉलवर चर्चा करत होते. राजकारणावर कुणीच चर्चा करत नव्हते.
- किमचे वजन लहानपणापासूनच अधिक आहे तसेच उंची सुद्धा फक्त 5.6 फुट एवढी आहे. तरीही तो अतिशय उत्कृष्ट बास्केटबॉल प्लेअर होता. मायकल जॉर्डन किमचा आवडता खेळाडू होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, असा बनला देशाचा सुप्रीम लीडर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.