आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mass Suicide ची सर्वात मोठी घटना; जेव्हा आत्महत्येसाठी तयार झाले 918 लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दिल्लीत एका कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. एकाचवेळी एकाच कुटुंबातील 11 जण आत्महत्या कशी करू शकतात असा प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतु, एक घटना अशीही घडली की ज्यामध्ये 10-12 नव्हे, तर तब्बल 918 लोक एकाचवेळी आत्महत्येसाठी तयार झाले. ही घटना जोन्स टाऊन प्रकरण म्हणून इतिहासाला एका काळा डाग आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी आत्महत्या करायला लावणारा एकच माणूस होता. त्यानेच या सर्वांना आत्महत्येसाठी तयार करून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली होती. नेमके काय होते हे प्रकरण आणि लोक तयार कसे झाले याची A टू Z माहिती आम्ही घेऊन आलो आहे. 


Cult ज्यात जात, धर्म, रंग विसरून सर्वांचे केले स्वागत
ख्रिश्चन घरात जन्माला आलेल्या जेम्स वॉरन जोन्स याने वयाच्या विशीत प्रवेश करताच स्वतःचा पंथ स्थापित केला. पीपल्स टेंपल नावाच्या पंथाकडून त्याने अमेरिकेच्या इंडियाना प्रांतात आपले पहिले चर्च उघडले. कुठल्याही जात आणि रंगाच्या लोकांच्या पीपल्स टेंपल Cult मध्ये स्वागत आहे असे त्याचे म्हणणे होते. त्याच्या अनुयायांची संख्या वाढत गेली. यानंतर त्याने अमेरिकेतील गुयाना येथे एका गावाची स्थापना केली. या गावाला पीपल्स टेंपल अॅग्रीकल्चरल प्रोजेक्ट असे नाव दिले. परंतु, अनुयायांसह माध्यमांमध्ये ते गाव जेम्स टाऊन या नावानेच ओळखले जाऊ लागले. 


कथित कम्युनिस्ट क्रांतीचा अड्डा बनले गाव
जिम जोन्स स्वतःला या लोकांचा मसीहा मानत होता. लोकांना फ्री जगण्याचे आवाहन करत असतानाच जिम जोन्सने गावात चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली. परंतु, हे मनोरंजक चित्रपट नव्हे, तर रशियन समाजवादी क्रांतीचे कौतुक करणारे चित्रपट होते. येथे येणाऱ्या लोकांना आणि लहान मुलांना त्याने नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोक्यात अमेरिका किती वाइट आहे आणि समाजवाद किती चांगले आहे असे विचार रुळले. येथे राहणाऱ्या लहान मुलांना तो कम्युनिस्टांवर भाषणे द्यायचा. त्यांना शाळेतही पाठवले जात नव्हते. उलट 8 तास कठोर परिश्रम आणि 8 तास क्रांतीकारी सोव्हिएत आणि कम्युनिस्ट विचारांचा अभ्यास अशी त्यांची दिनचर्या बनली होती. त्याच्या परवानगी शिवाय कुणालाही कुठेही जाऊ दिले जात नव्हते. त्याने स्वतःची एक खासगी आर्मी तयार केली होती. 


...मग लागले अमली पदार्थांचे व्यसन
- 70 च्या दशकात जेम्स वॉरन जोन्स उर्फ जिम जोन्स अमली पदार्थांच्या आहारी गेला. लोकांना कंट्रोल करण्यासाठी सुद्धा तो या अमली पदार्थांचा वापर करायला लागला. स्वभावात रागीटपणा आल्यानंतर तो आपल्या गावातील लोकांना शिक्षा द्यायला लागला. कुणी ऐकत नसल्यास त्यांना बेदम मारहाण केली जायची. लहान मुलांनी चूक केल्यास त्यांना रात्रभर विहीरीत उलटे टांगले जायचे. अर्थातच जोन्स टाऊन या गावकरी आणि त्याच्या अनुयायांसाठी एक जेल बनले होते. 

 

आत्महत्येच्या दिवशी नेमके काय झाले...?
> वाढत्या तक्रारींनंतर तत्कालीन खासदार लिओ रियान यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यीय शिष्टमंडळाने जोन्स टाऊनला भेट देऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. शिष्टमंडळाचा दौरा होण्यापूर्वी जेम्स टाऊनचे लोक किती खुश राहतात हे दाखवण्यासाठी अनुयायांकडून रिहर्सल करून घेतले. परंतु, तयारी होण्यापूर्वीच रियान यांचे शिष्टमंडळ गावात येऊन धडकले.
> यावर घाबरलेल्या जिम जोन्सने आपल्या खासगी आर्मीकडून शिष्टमंडळावर गोळीबार केला. खासदार रियान यांना 20 गोळ्या लागल्या. यानंतर आपल्या आश्रमाचे काही खरे नसल्याचे त्याला कळाले. आणि त्याने असे षडयंत्र रचले की त्यातून इतिहासातील सर्वात वाइट घटनांपैकी एक घडली. 
> जिम जोन्सला याचा अंदाज आला होता की आता अमेरिकन आर्मी आपल्या आश्रमावर हल्ला करू शकते. अमली पदार्थांनी डोके खराब झालेल्या जोन्सने आपल्या अनुयायांमध्ये सामूहिक आत्महत्येची कल्पना मांडली. लवकरच फासिस्टवादी आर्मीचे आक्रमण होणार आहे असा प्रसार त्याने गावात केला. 
> अमेरिकेची फासिस्ट आर्मी तुमच्या लहान मुलांना नेऊन कट्टर बनवणार असे भाषण केले. आपल्यापुढे सामूहिक आत्महत्येची क्रांती केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. साऱ्या जगाला आत्महत्येची क्रांती करून जागे करू असे आवाहन त्याने अनुयायांना केले. तसेच सामूहिक आत्महत्येची तयारी सुरू केली. 
> विविध प्रकारचे अमली पदार्थ, केमिकल आणि सायनाइडने त्याने विष तयार केले. हे विष इंजेक्शन्समध्ये भरून सर्वांना रांगेत उभे करून वाटायला सुरुवात केली. लोक ते इंजेक्शन आपल्या लहान मुलांच्या तोंडात मारून स्वतःला सुई टोचत होते. 
> या विष प्रयोगाने अवघ्या 5-5 मिनिटांत लोकांचा मृत्यू व्हायला लागला. हे संपूर्ण प्रकरण त्याने रेकॉर्ड सुद्धा केले. त्यामध्ये लहान मुलांच्या तडपून ओरडण्याचा आवाज ऐकायला येतो. सोबतच, रडण्याकडे दुर्लक्ष करा मृत्यू अटळ आहे असे आवाहन करताना जिम सुद्धा ऐकायला येतो. अशाच प्रकारे अवघ्या 40 मिनिटांत 918 जणांचे मृतदेह पडले होते. यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आयुष्य संपवले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, असे होते Mass Suicide नंतर घटनास्थळाचे चित्र...

 

बातम्या आणखी आहेत...