आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे भरतो नवरींचा बाजार, पैसे देऊन खरेदी केल्या जाते हवी ती पत्नी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - तीन वर्षातून एकदा बुल्गारियातील स्टारा जागोर नावाच्या ठिकाणी नवरींचा बाजार भरतो. येथे तरुण मुलगा येऊन आपल्या पसंतीच्या मुलीची चक्क खरेदी करून तिला पत्नी बनवू शकतो. हा मेळावा अर्थातच लग्नाचा बाजार अशा गरीब लोकांकडून लावलो जातो ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. जेणेतरून ते आपल्या मुलीचे लग्न लावून देऊ शकतील.

 

नवऱ्याच्या आई-वडिलांना द्यावे लागतात पैसे...
- तरूणींना म्हणजे नवरी मुलीला चांगल्या कपड्यात नटवून बसवले जाते.
- विकली जाणाऱ्या नवरीत सर्व वयोगटातील महिला असतात.
- नवरी खरेदी करण्यासाठी तरुणासोबत त्याचे आई-वडिलही येतात. 
- नवरा मुलगा प्रथम आपल्याला आवडेल अशी मुलगी शोधतो. त्यानंतर बोलणी चालणी होतात.
- नवरी पसंत आल्यानंतर तो आपल्या आई-वडिलांना सांगतो मग दोन्ही वर-वधूचे पालक खरेदीची रक्कम ठरतात. 
- नवरी खरेदीचा हा प्रकार बुल्गारियात गरीब लोकांत परंपरेने चालत आहे. त्याला कोणताही कायदा रोखू शकत नाही.

 

नियमाचे होते काटेकोरपणे पालन
- ही प्रथा गरीब लोकांची आर्थिक स्थिती ध्यानात घेऊन सुरु केली होती.
- बाजारात असेच लोक येतात ज्यांची मुलीचे लग्न करण्याची आर्थिक कुवत नसते.
- बाजारात नवरी मुलगी एकटी येत नाही. तिच्यासमवेत परिवारातील सदस्य असणे आवश्यक असते. 
- आपल्याकडे नव-या मुलाला हुंडा दिला जातो. मात्र तेथे याच्या उलट प्रथा आहे. येथे मुलाच्या पालकांना मुलीच्या पालकांना पैसे द्यावे लागतात.
- यामुळे गरीबांना आर्थिक मदतही होते. हे गृहित धरूनच कायदा त्याला परवानगी देतो. तसेय याचे काटेकोरपणे पालन केले जाते.
- हा बाजार बुल्गारियातील कलाइदझी समुदायाद्वारे लावला जातो. या समुदायातील मुलीशिवाय बाहेरील व्यक्ती नवरी म्हणून स्वीकारली जात नाही.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...