आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला डॉगीसारखे फिरवणारा कॅन्डीमनला हव्या 5 नवीन गर्लफ्रेंड्स, या आहेत अटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - कॅन्डीमन नावाने ओळखल्या जाणारा तंबाखू सम्राट ट्रॅवर्स बेनॉनला आता 5 नवीन गर्लफ्रेंड्स हव्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने आपल्या नवीन गर्लफ्रेंडच्या शोधात एक जाहिरात सुद्धा दिली आहे. होणाऱ्या गर्लफ्रेंडने माझी एक पत्नी आणि दोन गर्लफ्रेंडसोबत बंगला शेअर करण्याची तयारी दाखवावी लागेल. असे त्याने म्हटले आहे. आपल्या पत्नी आणि गर्लफ्रेंडला गळ्यात पट्टा बांधून पार्किंगपर्यंत घेत जातानाचा व्हिडिओ आणि फोटो त्याने सोशल मीडियावर अपलोड केले होते. तेव्हापासूनच तो जगभरात चर्चेत आला. 

 

दिली अशी जाहिरात...
- 4 मुलांचा बाप 46 वर्षीय कॅन्डीम सध्या 5 नवीन प्रेयसींच्या शोधात आहे. त्यांना ब्रेकफास्ट करणे, सोबत फोटोज काढणे आणि वाइल्ड फँटेसी पूर्ण करण्यास तयार राहावे लागेल असे तो म्हणतो. 
- ब्रिटिश दैनिक द सनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितल्याप्रमाणे, मास्टर बेडरुममध्ये 5 आणखी गर्लफ्रेंड राहू शकतील इतके मोठे बेड बनवण्यात आले आहे. यासाठी त्याने जाहिरात सुद्धा दिली आहे. 
- जाहिरातीनुसार, गर्लफ्रेंड होऊ इच्छिणाऱ्या तरुणीकडे डिझायनर कपडे, अॅक्सेसरीज, जगभरातील फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये फिरणे, महागड्या कार आणि ज्वेलरी घालून रिलॅक्स करण्याची आणि प्रायव्हेट जेटसह आलीशन बंगल्यात जगण्याची संधी आहे. 
- नेहमीच मेक-अपमध्ये राहणे, फिगर आणि कपड्यांसह ग्लॅमरस स्टाइल मेंटेन करणे आणि हवे तेव्हा पूलमध्ये येऊन रिलॅक्स करणे अशी अपेक्षा त्याला एका गर्लफ्रेंडकडून आहे. 
- या सर्वांना रात्री कॅन्डीमनच्या मास्टर बेडरुममध्ये एकाच बेडवर झोपावे लागेल. हा बेड तीन मोठ्या पलंगांना जोडून तयार करण्यात आला आहे. सध्या तो हा बेड पत्नी आणि गर्लफ्रेंडसोबत शेअर करतो.


असा आहे कॅन्डीमनचा बंगला
- 46 वर्षीय कॅन्डीमॅनचा बंगला गोल्ड कोस्टमध्ये असून त्याने 2010 मध्ये ते 24 कोटी रुपयांत विकत घेतले होते. यानंतर त्याने आपल्या पार्ट्यानुसार घरातील इंटीरिअर बदलले. 
- बंगल्याचा प्रवेश द्वार लाकडी असला तरीही त्यावर सोन्याचा मुलामा आहे. प्रवेश करताच महागड्या कलाकृती दिसून येतात. 
- 15 बेडरूम आणि 19 बाथरुमच्या या बंगल्यातील स्वीमिंग पूलला देखील सोना चढवण्यात आला आहे. यातील सिनेमा हॉल आणि चक्क भिंतींवर सुद्धा ठिक-ठिकाणी सोन्याच्या कलाकृती आहेत. सोबतच सोन्याने मढलेल्या वॉर्डरोबमध्ये ब्रँडेड कपडे आणि शूजसह अॅक्सेसरीज भरल्या आहेत. 
- त्याच्या घरातील कार आणि बाइकसह अनेक वस्तूंवर त्याचा नावाचा आणि कंपनीच्या नावाचा लोगो आहे. 
- दोन वर्षांपूर्वीच त्याने आपल्या घराच्या रिनोव्हेशनसाठी 1 कोटी अमेरिकन डॉलर खर्च केले. तसेच स्वीमिंग पूल आणि गार्डनला नवीन आकार दिला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कॅन्डीमॅनच्या आलीशान आणि रंगेल लाइफचे Photos

बातम्या आणखी आहेत...