आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंडत्वाचा आदर करणाऱ्या प्रकल्पाचे भारत स्वागत करेल : पंतप्रधान मोदी यांचे चीनला उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्विंगदाओ - चीनच्या क्विंगदाओमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १८ व्या शांघाय सहकार्य संघटन परिषदेच्या(एससीओ) उद््घाटन सत्रात भाषण केले. त्यात त्यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी सार्वभौमत्व, आर्थिक विकास व एससीआे देशांत एकात्मता व संपर्कावर भर  दिला. मोदी म्हणाले, सर्वसमावेशक, चिरंतन व पारदर्शक कोणत्याही प्रकल्पाचे भारत स्वागत करेल. सर्व सदस्य देशांचे सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडत्वाचा सन्मान करावा. मोदींनी चीनच्या वन बेल्ट वन रोड(ओबीओआर)वर निशाणा साधला. त्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये रस्त्याचे काम करत आहे.  


मोदींनी  सिक्युअर मंत्रही दिला. ते म्हणाले, एसचा अर्थ सिक्युरिटी ऑफ सिटिझन्स, ई-इकॉनॉमी डेव्हलपमेंट, सी-कनेक्टिव्हिटी इन द रिजन, यू-युनिटी, आर- रिस्पेक्ट सॉव्हरिनिटी अँड इंटेग्रिटी व ई- एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन आहे. कनेक्टिव्हिटीचा अर्थ भौगोलिक नव्हे लोकांशी संपर्क आहे. भारताला एससीओशी सहकार्य करण्यास आवडेल.

 

> परिषदेत मोदींनी उचलले महत्त्वाचे मुद्दे  

दहशतवाद : अफगाणसाठी शांततेचा पुढाकार

मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले,  भारताच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही.  अफगाणिस्तान दहशतवादाच्या प्रभावाचे सर्वात दुर्दैवी उदाहरण आहे. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी शांततेसाठी पाऊल उचलले आहे.

 

पर्यटन: एससीओ देशांतून भारतात पर्यटकांची मागणी  

मोदी म्हणाले, भारतात येणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये केवळ ६%  एससीआे देशांतून येतात. हे प्रमाण  दुप्पट केले जाऊ  शकते.  आपल्या संस्कृतीबाबत जागरूकता वाढवल्यास त्यात वाढ होऊ शकते. भारतात एससीओ फूड फेस्टिव्हल तसेच  बौद्ध फेस्टिव्हलचे आयोजन करू. 

 

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाक उघडा पाडता येईल  

एससीओमध्ये चीन, रशियानंतर भारत तिसरा मोठा देश आहे. एससीओ जगातील बड्या प्रादेशिक संघटनांपैकी एक आहे. एससीओशी जोडल्यामुळे भारताचा सामरिक व आर्थिक दृष्टीने फायदा होईल. भारत एससीओ मंचास माध्यम बनवून दहशतवादाच्या मुद्द्यावर  पाकला सदस्य देशांमध्ये उघडा पाडू शकतो.

 

एका मंचावर आल्याने चीनशी चांगले नाते 

एससीओमध्ये भाग घेतल्यामुळे भारत व चीनचे संबंध आगामी वर्षांत आणखी चांगले होतील. यानिमित्त भारत व चीन यांच्यात ब्रह्मपुत्रेच्या पाण्याच्या माहितीबाबत करार झाला. तांदूळ व अन्य कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबत नवा दृष्टिकोन बनला आहे. औषध व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्यावर चर्चा झाली.

 

मोदी पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना भेटले, १० सेकंदांत दोनदा चर्चा  

छायाचित्र परिषदेच्या मंचाचे आहे.  ज्या वेळी मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी भेटत होते तेव्हा मागून पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन आले. ममनून यांनी हात पुढे केला तेव्हा मोदींनीही हात  मिळवला. दोघांत दोनदा १० सेकंद चर्चा झाली.

 

 

 

 

  

 

 

बातम्या आणखी आहेत...