आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क - मोठे सांगून गेले आई-वडिलांचे मोल्यवान असतात त्यावर दुर्लक्ष करू नका. तरीही काही मुलांना ते आवडत नाही. ऑस्ट्रेलियातील एका मुलाला याचा खरा अर्थ कळाला. एवढेच नव्हे, तर त्या सल्ल्याने त्याचे समस्त आयुष्य बदलले आहे. त्याला हा सल्ला मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांनी दिला होता. त्यावर अंमलबजावणी केली आणि त्या मुलाला आज 80 लाख अमेरिकन डॉलर अर्थातच जवळपास 53 कोटी रुपये मिळाले आहेत.
काय आहे प्रकरण?
>> सिडनीत राहणाऱ्या एका व्यक्तीने कोट्यधीश बनण्याची भावनिक कहाणी व्यक्त केली आहे. त्याचे वडील मृत्यूशय्येवर होते. त्यांनी मरताना मुलाला लॉटरीत जॅकपॉट नंबर लागणार असे सांगितले होते. त्यासाठी तुला 7 नंबरवर बाजी लावावी लागेल असे त्यांनी म्हटले होते.
>> मरणारा कधीच खोटे बोलत नाही असे म्हटले जाते. मरतानाच त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांच्या मुलाने लॉटरीत 7 नंबर लावावा. त्या मुलाने आपल्या वडिलांचा सल्ला ऐकूण नशीब आजमावले. त्याने लोटोचे तिकीट खरेदी करून 7 नंबरवर दाव खेळला.
>> नाव जाहीर करण्यास नकार देणाऱ्या त्या मुलाने सांगितल्याप्रमाणे, विनिंग नंबर्स 9, 5, 32, 13, 33, 4 आणि 25 होते. पण, 7 नंबर हा जॅकपॉटचा नंबर होता. त्यावरच त्याला 80 लाख डॉलर मिळाले आहेत.
>> त्याचे वडील नेहमीच आपले नशीब लोटोमध्ये आजमावत होते. लॉटरीचा जॅकपॉट लागला तो फक्त 7 नंबरवरच लागणार असा त्यांना हयात असताना आणि मरताना देखील विश्वास होता. आयुष्यातील 20 वर्षे त्यांनी फक्त 7 नंबर लावून लोटोमध्ये नशीब आजमावले. तसेच त्यांची शेवटची इच्छा होती की मुलाने सुद्धा तोच नंबर आजमावा.
>> लॉटरीत मिळालेली सगळीच रक्कम जिवंत असताना पूर्णपणे आपल्या कुटुंबावर खर्च करणार आणि त्यांच्यासोबतच राहणार असे विजेत्याने स्पष्ट केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.