आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टचस्क्रीन पिढी पेन्सिल पकडण्यात कमकुवत;इंग्लंडच्या संस्थेने केलेल्या संशोधनातून बाब उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- स्मार्टफोनचा वापर वाढल्याने मुले परंपरागत खेळांपासून दूर जात आहेत. हातातील मांसपेशी कमकुवत होत असल्याने टचस्क्रीन पिढीला पेन्सिल पकडण्यापासून चित्र काढण्यातही अडचणी येत आहेत. इंग्लंडच्या राष्ट्रीय हस्ताक्षर संघटनेने केलेल्या संशोधनातून या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 


जन्म होताच मोबाइल, टॅब्लेट किंवा इतर गॅजेटशी मुलांचा संपर्क होत आहे. दोन वर्षांपेक्षा कमी वयाची ५८ टक्के मुले फोनशी खेळत असल्याचे संशोधनातून समोर आले. पूर्वी मुले पारंपरिक खेळात रममाण होत असत. मैदानी खेळही मोठ्या प्रमाणात खेळले जात होते. मोबाइल फोनवर खेळण्याचे प्रमाण वाढल्याने सध्या टचस्क्रीन पिढी तयार होत आहे. त्यामुळे मुलांची हालचाल थांबली आहे. मुले जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी  शाळेत जातात तेव्हा याचे दुष्परिणाम दिसून येतात. पेन्सिल पकडताना, चित्र काढताना त्यांना अडचणीला सामोरे जावे लागते. त्यांचे हस्ताक्षरही बिघडत आहे. 


संशोधकांच्या मते, आई-वडिल मुलांच्या हातात सहजरित्या फोन देत असल्याने त्यांच्या सवयी बिघडत आहेत. मुले जर पहिले बोट आणि अंगठ्यात पेन्सिल पकडत असतील तर ती योग्य पद्धत आहे. याला ‘डायनॅमिक ट्रायपॉड’ असे म्हणतात. या दोन बोटां व्यक्तिरिक्त इतर बोटांत पेन्सिल पकडली जात असेल तर त्यांच्या इंडेक्स फिंगरची मांसपेशी कमकुवत झाल्याचे हे द्योतक आहे. 


सहा वर्षांचा मुलगा पेन्सिल पकडण्यासाठी घेत आहे फिजिओथेरपी

लंडनमधील सहा वर्षाचा मुलगा पेट्रीक मागील वर्षीपासून शाळेत जात आहे. त्याला पेन्सिल पकडताना अडचण निर्माण होते. त्याच्या बोटातील मांसपेशी कमकुवत झाल्या आहेत. जास्त काळ पेन्सिल पकडल्यास त्याच्या हातावर सूज येते. आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्याला टचस्क्रीन पिढीतील आजार झाल्याचे समोर आले. सध्या तो फिजियोथेरपी घेत आहे. आठवड्यातून दोनदा त्याला थेरपी घेण्यास डॉक्टरांकडे जावे लागते. या प्रकरणावरून संशोधक मोबाइलमुळे वाढती समस्या रोखण्यासाठी जनजागृती करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...