आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियात नरकापेक्षा कमी नाही महिलांचे दैनंदिन आयुष्य, ही आहेत कारणे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबिया सरकारने महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सौदीच्या राजेशाही शासनाने महिलांना लष्करात सामिल होण्याची परवानगी दिली. तत्पूर्वी महिलांचे जगणे काही सोपे नव्हते. सुधारणावादी धोरणांमध्ये सौदी अरेबियाने महिलांसाठी अनेक आधुनिक बदल घडवून आणले आहेत. तर काही कायद्यांमध्ये अद्यापही बदल करण्यात आलेला नाही.

 

सौदी सरकारने महिलांना मैदानावर जाण्याची परवानगी दिली, ड्रायव्हिंगचे निर्बंध उठवले. तसेच नोकरी करण्याची संधी दिली. पण, आजही सौदीच्या महिलांना हिजाब, अबाया आणि बुरख्यात राहावे लागते. अशात या महिलांच्या आयुष्यात कोणते बदल झाले आणि कोणत्या अधिकारांसाठी त्या अजुनही झटत आहेत याबद्दल आम्ही माहिती देत आहोत. 

 

प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी पुरुष साक्षीदार आवश्यक

सौदी अरेबियात महिला एकट्याने प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकत नाहीत. कुठल्याही महिलेला प्रॉपर्टीचा सौदा करण्यासाठी दोन पुरुष साक्षीदार आवश्यक आहेत. त्याशिवाय त्या महिलेची ओळख सिद्ध होत नाही. एवढेच नव्हे, तर जे दोन पुरुष साक्षीदार होत आहेत, त्यांची शहनिशा करण्यासाठी आणखी 4 पुरुषांची चौकशी केली जाते. 

 

पुढे वाचा, इतर कारणे आणि झालेले महत्वाचे बदल...

बातम्या आणखी आहेत...