आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळापूर्वी नासाने चांद्र मोहीम करावी- ट्रम्प; अमेरिकेच्या नव्या अवकाश धोरणावर स्वाक्षरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या नव्या अवकाश धोरणावर स्वाक्षरी केली. यामध्ये अमेरिकी अंतराळवीरांना आगामी दशकात चांद्र मोहिमेवर पाठवण्याची योजना आहे. याशिवाय मंगळ मोहिमेचा आराखडाही नव्या धोरणाचा भाग आहे. मात्र मंगळ मोहिमेपूर्वी नासाने चांद्र मोहीम हाती घ्यावी, असे राष्ट्राध्यक्षांनी सुचवले.  ‘अंतराळ धोरण दिशानिर्देश-१’ वर त्यांनी स्वाक्षरी केली. चंद्रावर अमेरिकी अंतराळवीरांना पाठवण्यावर यात भर दिला आहे. 

अंतराळ संशोधनात अनेक पटींनी विकास करण्यासाठी प्रशासनाचा पाठिंबा आहे. यापूर्वी २१ जुलै १९६९ रोजी अमेरिकी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते.  


या मोहिमांविषयीचे दिशानिर्देश नव्या धोरणात दिले असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. अपोलो मोहिमेत १९६० आणि १९७० मध्ये अमेरिकी अंतराळवीर चंद्रावर गेले होते. पुढील मोहिमेत केवळ अमेरिकी ध्वज रोवणे आणि मानवाची पावले उमटवण्यासाठी अंतराळवीर मोहीम हाती घेणार नाहीत. मंगळ मोहिमेच्या तयारीसाठी ते अंतराळात जातील, असे ट्रम्प म्हणाले. मानवतेला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी नासा करेल. 

 

अमेरिकी सैन्यात होणार ट्रान्सजेंडर्सची भरती 
अमेरिकेत पुढच्या वर्षी १ जानेवारीपासून ट्रान्सजेंडर्स व्यक्तींची सैन्यात भरती होऊ शकेल. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने सैन्यात ट्रान्सजेंडर्स भरती करण्यास बंदी घालणाऱ्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला फेटाळून लावले. पेंटागॉनने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, ट्रान्सजेंडर्स भरतीविषयी न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाचे पालन केले जाईल. 

 

बातम्या आणखी आहेत...