आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-उत्तर कोरिया समिटवर Trump यांची तिसरी पलटी; आता म्हणे, भेट 12 जूनलाच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन -  उत्तर कोरियाच्या भेटीसंदर्भात आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची तिसरी प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्या भेटीची तारीख आणि ठिकाण जाहीर केले. यानंतर घुमजाव करत ही भेट रद्द झाल्याची घोषणा सुद्धा केली. आता मात्र ट्रम्प आपल्याच     वक्तव्यावरून तिसऱ्यांदा पलटले आहेत. त्यांनी जुन्या सर्व प्रतिक्रिया विसरून किम यांच्याशी सिंगापूरमध्ये होणारी भेट नियोजित वेळेनुसार होईल असे जाहीर केले आहे. त्यांनी रविवारी ट्वीट करून ही माहिती दिली. ही भेट 12 जूनला होणार असे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. 


भेट रद्द केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्वीट
- उल्लेखनीय बाब म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर आणि आपण सिंगापूरमध्ये 12 जून रोजी भेटणार असे जाहीर केले. त्यानुसार, उत्तर कोरिया सरकारने अधिकृत घोषणा करत आपले अण्वस्त्र चाचणी स्थळ उद्ध्वस्त करत असल्याचे म्हटले होते. 
- ट्रम्प यांनी ट्वीटवर ठिकाण आणि तारीख दोन्ही जगजाहीर केल्या. उत्तर कोरियात हेरगिरीच्या आरोपांत कैद असलेले 4 नागरिक सोडवले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर सपत्निक पोहोचले. फोटोसेशनही केला. तसेच गेल्या आठवड्यात उत्तर कोरियासोबतची भेट काही शक्य नाही. ती रद्द झाली असे त्यांनी ट्वीट करून सांगितले. 
- पण, उत्तर कोरियाने आपले आश्वासन मोडले नाही. त्यांनी 23 मे रोजी अण्वस्त्र चाचणी स्थळ आंतरराष्ट्रीय मीडियासमोर नष्ट करणार असे जाहीर केले होते. त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले. कदाचित त्यामुळेच आपल्या विधानाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भेट नियोजित वेळेवरच होईल असे स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर आपले एक शिष्टमंडळ सिंगापूरला देखील रवाना केले. 


दुसऱ्यांदा भेटले कोरियन देशांचे नेते
अमेरिकेने तिकडे भेट रद्द करत असल्याचे सांगितले. पण, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन ठाम होते. त्यांनी ठरवलेल्या वेळेनुसार, आपले कट्टर शत्रू राष्ट्र दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांची भेट घेतली. सीमेवर शनिवारी झालेली ही दोन्ही नेत्यांची दुसरी भेट होती. सीमावर्ती भागावर झालेल्या या भेटीत किम यांनी घट्टा गळाभेट घेऊन आपल्या नवीन मित्राचे स्वागत केले. तसेच दोन्ही देशांनी 2 तास एकमेकांशी मुक्त संवाद साधला.

 

बातम्या आणखी आहेत...