आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम जगाने सहकार्य करावे; इफ्तार पार्टीत ट्रम्प यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून प्रथमच इफ्तार पार्टीचे यजमानपद स्वीकारले. मुस्लिम जगाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या पार्टीत उपस्थितांना केले. भविष्य सुरक्षित आणि भरभराटीचे ठेवण्यासाठी हे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी इफ्तारचे यजमानपद स्वीकारण्याचे त्यांनी टाळले असल्याने यंदा त्यांचा सहभाग अनेकांसाठी धक्कादायक होता.

 

गेल्या वर्षी  व्हाइट हाऊसमधील अनेक वर्षांची परंपरा इफ्तारमध्ये सहभागी न होऊन ट्रम्प यांनी तोडली होती. ट्रम्प यांचा मुस्लिम विरोध पाहता त्यांनी यंदा ‘रमजान मुबारक’ म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. रमजानच्या पवित्र पर्वामध्ये आपण जगासाठी भरभराटीची प्रार्थना करू, असे ट्रम्प या वेळी बोलताना म्हणाले.  ट्रम्प यांच्या इफ्तारमध्ये विविध मुस्लिम देशांचे राजनयिक सहभागी झाले होते. साैदीचे राजदूत युवराज खालिद बेन सलमान, जॉर्डनचे राजदूत दिना कवार, इंडोनेशियाचे राजदूत आदींसह ट्रम्प यांनी इफ्तारचे भोजन घेतले. याच वेळी व्हाइट हाऊसबाहेर विविध मुस्लिम संघटनांच्या सदस्यांनी इफ्तार केला. 

 

यांची विशेष उपस्थिती...
उपराष्ट्रपती माइक पेन्स, लेखा सचिव स्टीव्हन मनुचिन, वाणिज्य सचिव विल्बर रोज आणि ट्रम्प यांचे जावई व सल्लागार जेरेड कुशनर या पार्टीत सहभागी होते. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...