आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

71 वर्षीय ट्रम्पनी 34 वर्षांच्या किमना अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी केले राजी ; अनेक वर्षांचा वाद सुटला 90 मिनिटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - कित्येक वर्षांपासून जागतिक राजकारणात आणि शस्त्रस्पर्धेत कायम परस्परांचे शत्रू राहिलेल्या अमेरिका व उत्तर कोरियादरम्यान मंगळवारी ७० वर्षांनंतर चर्चा सुरू झाली. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उ. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी सिंगापूरच्या सँटोसा बेटावर कापेला हॉटेलमध्ये परस्परांची भेट घेतली. ७१ वर्षीय ट्रम्प यांनी ३४ वर्षीय किम यांना त्यांच्याकडील अण्वस्त्रे पूर्णपणे नष्ट करण्याच्या मुद्द्यावर अखेर राजी केले. ट्रम्प यांनी या बदल्यात किम यांना सुरक्षिततेची हमी दिली. उत्तर कोरियाची महत्त्वाची मागणी मान्य करून ट्रम्प यांनी दक्षिण कोरियासोबत संयुक्त युद्धसराव रद्द करण्याची घोषणा केली. 


दरम्यान, आण्विक चाचण्यांसाठी उत्तर कोरियावर असलेले निर्बंध आण्विक नि:शस्त्रीकरण सुरू होईपर्यंत कायम राहतील. प्रथमच परस्परांसमोर आलेल्या ट्रम्प-किम यांनी १२ सेकंद हस्तांदोलन केले. दोन्ही नेते सुमारे ९० मिनिटे सोबत होते. यात ३८ मिनिटे त्यांनी बंदद्वार चर्चा केेली. या वेळी केवळ दुभाषे उपस्थित होते. भोजनाच्या वेळी या नेत्यांनी प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. गेल्या ७० वर्षांत अमेरिका-उत्तर कोरियादरम्यान झालेला हा पहिला करार आहे. विशेष म्हणजे, हॅरी एस. ट्रुमनपासून बराक ओबामांपर्यंत १२ अमेरिकी अध्यक्ष उत्तर कोरियाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले होते. ट्रम्प-किम यांच्या भेटीचे चीन, द. कोरिया, भारत, रशियासह जगातील अनेक देशांनी स्वागत केले. 
 

इतिहासात अमेरिका-उ. कोरियाची पहिली संयुक्त पत्रकार परिषद : ट्रम्प म्हणाले -किम यांना व्हाईट हाऊसचे निमंत्रण देईन, मी पण प्योंगयांगला जाईन : ट्रम्प-किम यांनी सुमारे एक तास पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे दिली. अमेरिकी अध्यक्ष व उत्तर कोरियाच्या प्रमुखांची इतिहासातील ही पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद. या वेळी किम फार मोजके बोलले. बहुतांश उत्तरे ट्रम्प यांनीच दिली.


- ट्रम्प म्हणाले, योग्य वेळ आल्यावर किम यांना व्हाईट हाऊसचे निमंत्रण देईन. मी पण प्योंगयांगला जाईन. उत्तर कोरियात रिअल इस्टेटसाठी चांगल्या संधी असल्याचे सांगून ट्रम्प म्हणाले, क्षेपणास्त्र चाचण्यांच्या चित्रीकरणात आकर्षक बीच दिसतात.


- ट्रम्प म्हणाले, उ. कोरिया आणि कोरियन द्विपकल्पांशी असलेल्या नात्यात मोठा बदल घडून येईल. किम अत्यंत हुशार आहेत. स्वत:च्या देशावर ते निस्सीम प्रेम करतात. जागतिक समस्यांची आम्ही दोन्ही नेते काळजी घेऊ.


जग अाता चांगला बदल बघेल
किम म्हणाले, पूर्वग्रह हीच मार्गातील प्रमुख अडचण होती. आता जग चांगला बदल पाहील. आमचा इतिहास आणि परस्परांबद्दलचे पूर्वग्रह या चर्चेच्या दिशेने पुढे जाण्यात प्रमुख अडचण होती. मात्र, आज हे सर्व ओलांडून आम्ही येथे एकत्र आहोत. जग आता चांगला बदल पाहू शकेल. नाइस टू मीट मिस्टर प्रसिडेंट.


ट्रम्पच्या कारसाेबत सेल्फी
-  बैठकीसाठी ट्रम्प लाल रंगाचा टाय घालून आले होते. उ. कोरियाच्या जनतेला लाल रंग खूप आवडतो.


-  बैठकीच्या वेळी ट्रम्प यांनी किमना हॉलीवूड स्टाईल एक व्हिडीओ दाखवला. यात शांतीचे फायदे दाखवण्यात आले होते.


- दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी सिंगापूर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी वापरलेल्या ८० वर्षे जुन्या मेजचा वापर केला.


- ट्रम्प यांनी किमना आपली लिमोझिन कार दाखवली. दरम्यान, एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने ट्रम्प यांच्या भेटीसाठी ३८ हजार खर्चुन हॉटेल शांग्रिलामध्ये खोली बुक केली. मात्र, तो ट्रम्प यांच्याऐवजी त्यांच्या कारसोबत सेल्फी काढू शकला.

 

ट्रम्पच्या सन्मानार्थ ७ मिनिटे अगोदर पोहोचले किम 
-  चर्चेच्या ठिकाणी किम सात मिनिटे अगोदरच पोहोचले. उ. कोरियन माध्यमांनुसार, येथील संस्कृती सांगते की लहानांनी मोठ्यांच्या अगोदर पोहोचले पाहिजे. ट्रम्पबद्दलआदर व सन्मान व्यक्त करण्याचा हा हेतू होता.
-  ९० मिनिटे दोन्ही नेते सोबत; ३८ मिनिटे बंदद्वार चर्चा, उद्यानात फेरफटका, सोबत जेवणही केले
-  द. कोरियाशी संयुक्त युद्धसराव अमेरिका बंद करणार, उ. कोरियावर निर्बंध सध्या कायम

 

पुढे, ऐतिहासिक भेटीच्या जेवणाचे मेन्युकार्ड...

 

अधिक माहितीसाठी हे हि वाचा, 90 मिनिटांत सोडवला 70 वर्षांचा वाद

 

बातम्या आणखी आहेत...