आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trump यांची भेट घेण्यासाठी मोजावे लागतात 4 लाख डॉलर, Media Reports चा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी इतर देशांच्या राष्ट्रपतींना पैसे द्यावे लागतात असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हा अनुभव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांना गेल्या वर्षी आला होता. ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या वृत्तानुसार, पोरोशेंको यांनी गतवर्षी ट्रम्प यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही मीटिंग अरेंज करण्यासाठी त्यांनी ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांना 4 लाख डॉलर अर्थात 2.73 कोटी रुपये द्यावे लागले आहेत. विशेष म्हणजे, कोहेन हे कायद्याने युक्रेनचे प्रतिनिधित्व करणारे अमेरिकन वकील नव्हते. त्यांना अशा प्रकारची कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती. तरीही त्यांनी ही मीटिंग अरेंज करण्यासाठी पैसे घेतले आहेत. बीबीसीने विविध सूत्रांचा दाखला देत कोहेन यांच्या अकाउंटमध्ये अनपेक्षिपत रक्कम युक्रेनमधून ट्रान्सफर झाली असे कन्फर्म केले. कोहेन यांनी आपल्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 


इतके आतुर होते पोरोशेंको, अशी ठरली भेट...
> युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी इतके आतूर होते की ते यासाठी काहीही करण्यास तयार झाले. कुठल्याही परिस्थितीत ट्रम्प यांची बॅक चॅनल मीटिंग घ्यायचीच आहे. त्यातच इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे ही भेट काही मिनिटांपुरती किंवा काही मिनिटे संवाद साधून फक्त हॅन्डशेकपुरती होऊ नये असा त्यांचा आग्रह होता.
> पोरोशेंको यांच्या मर्जीतील खासदार आणि मंत्र्यांमध्ये एक चर्चा झाली. बीबीसीला कीव्ह येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अमेरिकेत ज्यू समुदायाच्या आणि तेथील ज्यू चॅरिटीच्या संपर्कात असलेल्या एका खासदाराला याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी आपल्या वैयक्तिक संपर्कांतून मीटिंग अरेंज करण्याचा प्रयत्न केला. त्याच सुत्रांनी संबंधित खासदाराला ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांच्यापर्यंत नेले. 
> 2017 मध्ये ही भेट झाली तरीही त्याची तयारी खूप दिवसांपासून सुरू होती. या मीटिंगमध्ये ट्रम्प यांच्याशी मुक्त आणि जास्त वेळ संवाद साधता यावा अशी तयारी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होती. ट्रम्प यांची मंत्रिमंडळासोबत एक बैठक होती. त्याच बैठकीदरम्यानच्या ब्रेकमध्ये पोरोशेंको यांना ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी पाठवले जाईल असे ठरले होते. परंतु, अशात ट्रम्प केवळ दोन मिनिटे बोलून हॅन्डशेक करून आपल्याला निरोप देतील अशी भिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना होती. यावर कोहेन आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद देखील झाले. 


नेमके काय होते भेटीचे कारण...
> युक्रेन सरकारने माध्यमाचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. तसेच त्यावेळी आणि आता सुद्धा ट्रम्प आणि पोरोशेंको यांच्यातील भेट एक बॅक चॅनल मीटिंग होती. त्यामध्ये दोन्ही देशांच्या हितांवर चर्चा झाली असा दावा केला. परंतु, या भेटीचे कारण काही औरच होते. 
> अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा प्रचार सुरू असताना त्यावेळी रिपब्लिकनचे उमेदवार ट्रम्प यांनी कॅम्पेनमध्ये रशिया आणि रशिया समर्थकांची मदत घेतल्याचा आरोप झाला होता. त्यापैकी एक युक्रेनमध्ये राहणारा रशिया समर्थक पॉल मॅनाफोर्टचे नाव समोर आले होते. प्रत्यक्षात हे नाव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पोरोशेंको यांनीच समोर आणून त्याच्या विरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली होती.
> अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रेटिक उमेदवार हिलेरी क्लिंटन यांचा विजय निश्चित असल्याचे पोरोशेंको यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी हिलेरींना समर्थन देत ट्रम्प यांना कथितरीत्या मदत करणाऱ्या आपल्या देशातील रशिया समर्थकांविरोधात चौकशी सुरू केली. प्रत्यक्षात ते एका पराभूत होणाऱ्या उमेदवाराचे समर्थन करत होते ही चूक नंतर त्यांच्या लक्षात आली. 
> मूळात ट्रम्प यांची नाराजी दूर करणे हा त्यांच्या भेटीचा सर्वात मोठा आणि छुपा एजंडा होता. त्यामुळेच ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर पोरोशेंको युक्रेनमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पहिले काम म्हणून पॉल मॅनाफोर्ट यांच्या विरोधातील चौकशी अप्रत्यक्षरित्या बंद केली. त्यांची चौकशी भ्रष्टाचार विरोधी मंडळाकडे सुरू होती. यानंतर त्यांच्या चौकशीचे डिपार्टमेंट बदलण्यात आले. त्यांनी मॅनाफोर्ट यांच्या विरोधातील केस कमकुवत केला.

 

बातम्या आणखी आहेत...