आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुणीभांडी करायची या राष्ट्राध्यक्षाची आई; हिटलरच्या देशातून आले होते पूर्वज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्ष अशी ओळख असलेले डोनाल्ड ट्रम्प यांची आई एक मोलकरीन होती. ऐकूण विश्वास बसणार नाही. परंतु, सत्य असेच आहे की ट्रम्प यांच्या वडिलांसोबत विवाह होण्यापूर्वी त्या लोकांकडे धुनी-भांडीचे काम करायच्या. मूळच्या स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या त्यांच्या आई वयाच्या 18 व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झाल्या. याच दपम्यान त्या मेड म्हणून काम करत होत्या. ट्रम्प यांच्या आई मॅरी अॅन आणि वडील फ्रेड ट्रम्प उर्फ ट्रम्प सीनियर यांचा विवाह 1936 मध्ये झाला. या विवाहानंतर अॅन यांचे भाग्य उजळले. 


आजोबा होते जर्मन...
- डोनाल्ड ट्रम्प यांचे वडिलांचे वडील फ्रेड्रिक ट्रम्प हे मूळचे जर्मन नागरिक होते. जर्मनीच्या पॅलेटीन प्रांतात जन्मलेले ट्रम्प यांचे आजोबा फ्रेड्रिक यांनी 1885 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतर केले. 1892 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
- सिएटलमध्ये त्यावेळी गृहनिर्माण क्षेत्रात उसंडी आली होती. त्याचा फायदा घेत त्यांनी रिअल एस्टेट बिझनेसला पसंती दिली. या दरम्यान अनेक रेस्टॉरंट आणि गृहनिर्माण प्रकल्पात काम केले. यानंतर स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुद्धा सुरू केला. याच दरम्यान आपले मूळ देश जर्मनीचा दौरा केला असताना त्यांची भेट एलिझाबेथ क्राइस्ट हिच्याशी झाली. त्या दोघांनी विवाह केला. 
- 1905 मध्ये फ्रेड (ट्रम्प सीनियर/ डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील) यांचा जन्म झाला. 1918 मध्ये ट्रम्प यांच्या आजोबांचे निधन झाले. कारभार मोठा होता आणि वारसदार लहान. त्यामुळे, ट्रम्प यांच्या आजी एलिझाबेथ क्राइस्ट यांनी रिअल एस्टेट बिझनेसची सुत्रे हाती घेतली. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षीच ट्रम्प यांचे वडील फ्रेड यांनी आपल्या आईला बिझनेसमध्ये हातभार लावण्यास सुरुवात केली. 
- 1923 मध्ये 'एलिझाबेथ ट्रम्प अॅन्ड सन' कंपनीची स्थापना करण्यात आली. तसेच त्यांचा बिझनेस कॅनडासह न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक वाढला. यानंतर कंपनीचे नाव बदलून द ट्रम्प ऑर्गेनायझेशन असे ठेवण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या वडिलांकडून रिअल एस्टेट बिझनेसची धुरा 1971 मध्ये मिळाली. 


आई होत्या मोलकरीन
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आई मॅरी अॅन मूळच्या स्कॉटलंड येथील रहिवासी होत्या. मॅरी अॅन यांनी 1930 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी स्कॉटलंड सोडले. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये आश्रय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु, हातात काहीच काम नव्हते. त्यामुळे, उदरनिर्वाहासाठी कित्येक वर्षे त्यांनी एक मोलकरीन म्हणून काम केले. 1936 मध्ये ट्रम्प सीनियर आणि मॅरी यांचा विवाह झाला. यानंतर दोघांनी क्वीन्स येथे स्थायिक होऊन आपल्या 4 मुला-मुलींच्या संगोपनाचा निर्णय घेतला. त्यापैकीच एक डोनाल्ड पुढे जाऊन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार होता. 


रेडिमेड बिझनेस मिळाल्यानंतरही स्वतःची वेगळी ओळख
- डोनाल्ड ट्रम्प यांना आपले आजोबा आणि वडिलांच्या मेहनतीचे फळ म्हणून एक रेडिमेड कंपनी मिळाली होती. अशाच परिस्थितीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. पण, ट्रम्प यांनी ते केवळ स्वीकारलेच नाही, तर यशस्वीरीत्या करूनही दाखवले.
- सर्वप्रथम त्यांनी आपल्या वडिलांसोबत मिळून अमेरिकेतील विविध शहरात उदयास येणाऱ्या शहरीकरणाकडे लक्ष वळवले. त्यांनी छोट्या आणि मध्यमवर्गियांच्या हाउसिंग मार्केटमध्ये हात घातले. ट्रम्प कंस्ट्रक्शनपेक्षा चांगले घर कुणीच देऊ शकणार नाही अशी ओळख मार्केटमध्ये निर्माण केली. 
- केवळ मध्यमवर्गीयच नव्हे, तर उच्चभ्रू घराण्यांच्या हाउसिंग प्रोजेक्टवर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची मजबूत पकड होती. त्यांनी मॅनहॅटन शहराच्या विकासाची सूत्रे यशस्वीरीत्या स्वीकारली. मॅनहॅटनमध्ये आजही गगनचुंबी आणि आलीशान इमारतींवर ट्रम्प यांचा ठसा आहे. बांधलेल्या प्रत्येक कंस्ट्रक्शनवर Trump Tower लिहिणे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची ही स्टाइल पुण्यातील ट्रम्प टॉवरवर सुद्धा दिसून येते.

 

पुढे वाचा, दारुला हातही लावत नाहीत ट्रम्प, हे आहे कारण...

 

बातम्या आणखी आहेत...