आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला Breast Implant साठी दबाव टाकायचे ट्रम्प, नवीन पुस्तकाचा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली मुलगी इव्हांका टीनेजर असताना तिच्यावर ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीसाठी दबाव टाकला होता. इव्हांका अगदी शाळेत असताना सुद्धा तिला मॉडेलिंगचे वेड लागले होते. यात वडील ट्रम्प यांनी तिला प्रोत्साहन देताना सर्जरीसाठी सुद्धा दबाव टाकला. हा खुलासा इव्हांका ट्रम्पवर आधारित Born Trump: Inside America's First Family पुस्तकात करण्यात आला आहे. हे पुस्तक एमिली जेन फॉक्स यांनी लिहिले आहे.


- एमिली जेन फॉक्स यांनी लिहिलेल्या पुस्तकात ट्रम्प घराण्यात जन्म घेणे काय असते हे दाखवण्यात आले आहे. यात इव्हांका आणि त्यांच्या भावांच्या लाइफस्टाइलवर चर्चा करण्यात आली. पण, माध्यमांमध्ये ट्रम्प आणि त्यांची मुलगी इव्हांकाची स्टोरी चर्चेत आहे.
- एमिली यांच्या पुस्तकानुसार, साहजिकच इव्हांका एका उच्चभ्रू शाळेत शिकत होती. त्या शाळेची वार्षिक फी तब्बल 44 हजार अमेरिकन डॉलर (30 लाख रुपये) होती. तरीही इव्हांका आपल्या महागड्या शाळेतून वेळ काढत फोटोशूट करत राहायची.
- ती शाळेतच असताना ट्रम्प यांना आपल्या मुलीचा मॉडेलिंगचा छंद लक्षात आला. त्यांनी इव्हांकाला यासाठी पुरेपूर प्रोत्साहित केले. एवढेच नव्हे, तर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी तुला स्तन वाढवण्याचे ऑपरेशन करावेच लागेल असा दबाव टाकला. 
- ट्रम्प यांची बहिण अर्थातच इव्हांकाची आत्या मॅरीअॅन यांनी या गोष्टीचा विरोध केला होता. इतक्या लहान वयात ब्रेस्ट इंप्लांट केल्यास ती बिघडेल असा इशारा सुद्धा दिला होता. परंतु, ट्रम्प यांनी काहीच ऐकले नाही. उलट मित्रांमध्ये सुद्धा गप्पा गोष्टी करताना आपल्या मुलीला या सर्जरीने फायदा होईल असे बोलून दाखवले होते. 


फोटोशूटसाठी सोडली शाळा, टीचर्सला झापले...
इव्हांका ट्रम्पला मॉडेलिंगचे इतके वेड लागले होते, की ती फोटोशूटसाठी काहीही करण्यास तयार होती. 30 लाख वार्षिक फी असलेल्या शाळेने त्याचा विरोधही केला. तरीही इव्हांका शाळेत दुसरा बहाणा करत आपल्या वडिलांच्या मार आ ला गो महालात फोटोशूटसाठी गेली होती. परतल्यानंतर शाळेने कारवाईचा इशारा दिला तेव्हा तिने उलट शिक्षिकांनाच झापले. ती पूर्णपणे मुलींची शाळा होती. तिने शाळाही सोडली. यानंतर तिच्या वडिलांनी चक्क 40 लाख वार्षिक फी असलेल्या शाळेत तिचे प्रवेश करून घेतले होते. या शाळेत तिला मॉडेलिंग आणि फोटोशूटसाठी अनुपस्थित राहिल्यानंतरही काहीच बोलले जात नव्हते. तिला शाळेत कुणी काही बोलू नये किंवा कारवाई करू नये अशी पूर्ण व्यवस्था ट्रम्प यांनी केली होती. ती शाळेत सुद्धा एखाद्या मॉडेलच्या रॅम्पवॉकप्रमाणे चालायची असा पुस्तकात उल्लेख आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, इव्हांकाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...