आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Trump Reverses Controversial Decision On Migrant Family Separations After Pressure From Wife Melania

पत्नीच्या हट्टापुढे नमले ट्रम्प; पालकांपासून चिमुकल्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेतला मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीररित्या अमेरिकेत दाखल होणाऱ्या शरणार्थींना त्यांच्या मुलांपासून दूर ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. गेल्या 6 आठवड्यात त्यांनी या निर्णयातून तब्बल 2500 चिमुकल्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून दूर ठेवले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांच्या वादग्रस्त निर्णयावर अमेरिकेसह जगभरातून टीका झाली होती. परंतु, त्या निर्णयाच्या सर्वात मोठ्या टीकाकार मेलेनिया ट्रम्प होत्या. त्यांनी आपल्याला या मुलांना पाहून त्यांच्या अवस्थेवर चीड येते असे म्हटले होते. त्यानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय मागे घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. 

 

ट्रम्प म्हणाले,
"आम्ही कुटुंबियांना सोबत ठेवण्यासाठी आणि सर्वच समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे मजबूत सीमा आहेत. सीमा तशाच मजबूत राहतील. निर्वासित आणि शरणार्थींच्या समस्या काही नवीन नाहीत. कारण, यापूर्वी सत्तेवर आलेल्या राष्ट्राध्यक्षांनी काहीही केलेले नाही. आम्हीच त्यावर काम करत आहोत. चिमुकल्यांना आई-वडिलांपासून दूर ठेवणे ही आमची इच्छा नव्हती. पण, आमच्या सीमेत कुणी घुसखोरी करावी हे देखील आम्हाला कदापी मान्य नाही."


पत्नीसह मुलीनेही केला होता विरोध
अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या वादग्रस्त निर्णयाचा त्यांच्या पत्नी मेलेनिया आणि मुलगी इव्हांका यांनी कळाडून विरोध केला होता. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे मीडियासमोर सुद्धा व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी निर्णय मागे घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करताना हा कुटुंबियांना सोबत ठेवण्यासाठी घेतलेला महत्वाचा निर्णय आहे असे म्हटले. पण, खरे पाहिल्यास त्यांनी केवळ इतरांच्याच नाही तर आपले कुटुंब वाचवण्यासाठी सुद्धा या नव्या आदेशावर स्वाक्षरी केली असे म्हटले जात आहे. सोबतच महत्वाचे म्हणजे, नेहमीच आपल्या आदेशावर ठाम राहणारे ट्रम्प यांनी प्रथमच स्वतः घेतलेला निर्णय मागे घेतला अशी प्रतिक्रिया अमेरिकन माध्यमांमध्ये उमटली आहे.

 

झाला इतका विरोध
- ट्रम्प यांनी सोमवारी आपल्या निर्णयाचा बचाव करताना बेकायदेशीर अमेरिकेत घुसणारे शरणार्थी चोर आणि खूनी असतात असे म्हटले होते. आम्ही देश आणि सीमा सुरक्षित करण्यासाठी त्यांना मुलांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घुसखोरांविषयी आमची झीरो टोलरेन्स पॉलिसी आहे. परंतु, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा घरासह जगभरातून विरोध झाला. 
- ट्रम्प यांच्या पत्नी आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी सुद्धा आपल्या कार्यालयातून या निर्णयावर टीका केली होती. त्या लहान मुलांची अवस्था पाहून आपल्याला चीड येत आहे असे त्या म्हणाल्या होत्या. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांच्या पत्नी लॉरा बुश यांनी सुद्धा या निर्णयास क्रूर निर्णय असे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर ट्रम्प यांचे पक्ष रिपब्लिकनच्या खासदारांनी सुद्धा त्याचा विरोध केला होता.

बातम्या आणखी आहेत...