आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प vs एफबीआय; रशिया प्रकरणी मेमोत छेडछाड ; जारी करणे बेपर्वाई : एफबीआय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकी गुप्तहेर संस्था एफबीआय आणि डोनाल्ड ट्रम्प सरकारदरम्यान पुन्हा एकदा वादाची स्थिती निर्माण झाली. एफबीआयने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, सत्तारूढ रिपब्लिकन पक्षाद्वारे निवडणुकीशी संबंधित गोपनीय दस्तऐवजांशी छेडछाड होणे दुर्दैवी आहे. ही कागदपत्रे २०१६ च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक विजयासाठी रशियाची मदत घेतल्यासंदर्भातील आहेत.  


एफबीआय ने यूएस हाऊस इंटेलिजन्स कमिटीच्या समोर कागदपत्रे सादर केली होती. यानंतर सोमवारी कमिटीने यातील निवडक मजकूर सार्वजनिक केला व त्याला मंजुरी दिली. ही माहिती व्हाइट हाऊसकडे पाठवली. हा अहवाल आता राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. ट्रम्प प्रशासन याला सार्वजनिक करु शकते. 

 

मेमोतील अनेक तथ्ये चूक..एफबीआयचे वक्तव्य  

 

आमच्या प्राथमिक तपासातील गोपनीय कागदपत्रांतील अनेक तथ्ये वगळली आहेत. ती चुकीच्या पद्धतीने मांडली आहेत. या मेमोच्या अचूकतेवर अनेक प्रश्न निर्माण होतात. याला जारी करणे बेपर्वाईचे ठरेल.  संस्था योग्य तपास यंत्रणेसह काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अॅक्ट (एफआयएसए) ची प्रकिया योग्य ठेवणे यामुळे शक्य होते. मेमोच्या पुनर्विलोकनासाठी आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही.  

 

 

> यूएस हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष डेव्हिन नन्स आहेत. त्यांनी ४ पानी मेमो व्हाइट हाऊसकडे पाठवला. त्यांच्यावर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अॅक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला होता.  

 

 

रिपब्लिकन ; एजन्सीने शक्तीचा गैरवापर केला 

 यूएस हाऊस इंटेलिजन्स कमिटीमध्ये बहुतांश सदस्य सत्तारूढ रिपब्लिकन पक्षाचे आहेत. रिपब्लिकन पक्षाने नुकतात आरोप केला होता की, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाकडून मिळालेल्या मदतीच्या प्रकरणाच्या तपासकार्यात अमेरिकी एजन्सीने आपल्या शक्तींचा गैरवापर केला आहे. त्यांनी तथ्यांना विपर्यस्त सादर केले. अधिकाऱ्यांनी चुकीची वक्तव्ये दिली. एफबीआयने मनमानी केल्याचे ट्रम्प यांनीही म्हटले होते.  

 

डेमोक्रॅटिक  ; तपासकार्य भरकटावे म्हणून जारी केला मेमो  

 विरोधी पक्ष डेमोक्रॅटने कमिटीद्वारे तयार केलेल्या मेमोला तपासकार्य भरकटण्यासाठीचे कृत्य म्हटले आहे. याच्या आैचित्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कमिटीचे सदस्य आणि डेमोक्रॅट सदस्य अॅडम स्निफ यांनी म्हटले की, मला कमिटीचे अध्यक्ष डेव्हिन नन्सद्वारे व्हाइट हाऊसला पाठवलेल्या मेमोमध्ये अनेक बदल दिसून आले. कमिटीने याला स्वीकारलेले नाही. मेमो सार्वजनिक केला तर कमिटी याशी सहमत नाही.  

 

 

वादाची सुरुवात - दीड वर्षापूर्वी सुरू झाले मतभेद  

२०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या विजयासाठी त्यांच्या निवडणूक प्रचार चमूवर रशियाशी साटेलोटे असल्याचा आरोप लावण्यात आला. एफबीआयनेदेखील म्हटले की, त्यांच्याकडे याशी संबंधित पुरावे आहेत. ट्रम्प यांनी याचा नेहमी इन्कार केला. राष्ट्राध्यक्षपदी आल्यावर ट्रम्प यांनी तत्कालीन एफबीआय संचालक जेम्स कोमी यांना पदावरून हटवले. कोमी याप्रकरणी तपासाचे नेतृत्व करत होते. ट्रम्प यांनी त्यांच्या जागी क्रिस्टोफर रे यांची नियुक्ती केली.  


- सोमवारी एफबीआयचे उपसंचालक अँड्रयू मॅकेब यांनी राजीनामा दिला होता. ते राजकीयदृष्ट्या पक्षपाती असल्याचा आरोप ट्रम्प यांनी अनेकदा केला होता. पद सोडण्यासाठी मजबूर केले होते. 

बातम्या आणखी आहेत...