आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश शिक्षक भारतीय विद्यार्थ्यांना देताहेत अंडरवेअरमध्ये Spoon ठेवण्याचे सल्ले; हे आहे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये एक शाळा भारतीय विद्यार्थ्यांना चक्क अंडरवेअरमध्ये चमचे ठेवण्याचे सल्ले देत आहे. यासाठी शाळेने आपल्या भारतीय आणि आशियाई विद्यार्थ्यांना चक्क एका रांगेत उभे करून चमचे वाटले. हे चमचे सर्वांनाच आपल्या अंतरवस्त्रांमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले आहे. शाळेच्या या अजब निर्देशावर सगळेच हैराण आहेत. विशेष म्हणजे, शाळेने यासंदर्भातील माहिती कुठल्याही विद्यार्थ्याच्या पालकांना दिली नाही. उलट पालकांना ही गोष्ट सांगू नका असेही त्यांना शाळेने म्हटले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, हा निर्णय विचित्र वाटत असला तरीही विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच घेण्यात आला आहे. 


बाल विवाह रोखण्यासाठी घेतला निर्णय...
- लीड्स येथील को-ऑपरेटिव्ह अकॅडमीच्या शिक्षिका हरिंदर कौर यांनी सांगितल्याप्रमाणे, हा निर्णय बाल विवाह रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या भारतीय आणि आशियाई मुला-मुलींचे त्यांच्या मर्जीविरुद्ध बालविवाह करून दिले जात आहे. बळजबरी त्यांना आपल्या मायदेशी नेऊन त्यांचे लग्न लावून दिले जात आहेत. भारत आणि आशियाई देशांच्या ब्रिटिश विद्यार्थ्यांना हा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळेच त्या सर्वांना आपल्या देशात जात असताना अंतरवस्त्रांमध्ये एक चमचा ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 
- हे विद्यार्थी जेव्हा आपल्या पालकांसोबत विमानतळावर जातील, तेव्हा सिक्यॉरिटी चेकवर मेटल डिटेक्टरवरून ते पास होऊ शकणार नाही. मेटल डिटेक्टरमध्ये सापडलेल्या मुलाला किंवा मुलीला गार्ड साहजिकच वेगळ्या खोलीत एकट्यात संवाद साधण्यासाठी घेऊन जातील. याचवेळी ते गार्ड्स आणि अधिकाऱ्यांना आपल्या पालकांबद्दल सांगू शकतील. ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, भारत आणि आशियाई वंशाच्या ब्रिटिश विद्यार्थ्यांचे बळजबरी बालविवाह लावून दिले जातात. यापैकी 80 टक्के बाल विवाह सुट्यांमध्ये मुला-मुलींनी मायदेशी घेऊन गेल्यानंतर लावले जातात. 

बातम्या आणखी आहेत...