आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका विधवेने पै-पै जोडून सुरू केली कंपनी, रॉयल एन्फील्डला देतेय टक्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इटलीतील लोकप्रीय मोटरसायकल कंपनी बेनेली भारतात रॉयल एन्फील्ड बुलेटला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपले नवीन मॉडेल एंपीरि‍यल 400 लॉन्‍च करण्याच्या तयारीत आहे. एंपीरि‍यल 400 ला भारतात सीकेडी रूटच्या माध्यमातून विकले जाणार आहे. यापूर्वी 2015 मध्ये या कंपनीने पुण्यातली डीएसके ग्रुपसह पार्टनरशिप करून भारतात पदार्पण केले होते. 


इटलीतील या लोकप्रीय कंपनीच्या एकाहून एक प्रॉडक्टची आपल्याला माहिती असेल पण, या कंपनीचा इतिहास त्याहून अधिक रोचक आहे. येथे आम्ही आपल्याला बेनेली मोटरसायक‍ल कंपनीबद्दल काही रोचक फॅक्ट्स सांगत आहोत. 
 

6 मुलांच्या आईने सुरू केला बिझनेस
बेनेली S.p.A ची सुरुवात इटलीच्या पेरासो शहरात 1911 मध्ये झाली. याची सुरुवात एका 6 मुलांची आई आणि विधवा असलेल्या टेरेसा बेनेली यांनी केली होती. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर टेरेसा यांनी पै-पै जोडून भांडवल उभे केले आणि कुटुंबातील संपूर्ण पैसा या कंपनीची सुरुवात करण्यासाठी लावला. आपल्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी बेनेली कंपनीची सुरुवात एका गॅरेजमधून केली. विशेष म्हणजे, या गॅरेजमध्ये फक्त 6 लोक होते. त्यामध्ये स्वतः टेरेसा आणि त्यांच्या 5 मुलांचा समावेश होता. सुरुवातीला पहिल्या महायुद्धात वॉर मशीन दुरुस्त करणे आणि घरातील स्पेअर पार्ट्स विकण्याचे काम या गॅरेजमधून केले. 


पहिल्या महायुद्धानंतर बनवली नवीन बाइक
- बेनेलीने 1919 मध्ये नवीन बाइक बनवली होती. त्याच वर्षी पहिले महायुद्ध संपले होते. यानंतर त्यांनी 75 सीसी टू स्‍ट्रोक इंजिन स्वतः डेव्हलप केला. 1921 मध्ये तेच इंजिन त्यावेळी सर्वात शक्तीशाली बाइकचा आधार बनले. याच इंजिनला मॉडिफाय करून रेस आणि इतर स्पर्धांमध्ये त्याचा वापर करण्यात आला. 
- दोन वर्षे इंजिनवर काम केल्यानंतर टेरेसा यांचा सर्वात छोटा मुलगा टोनिनो त्याच इंजिनने बनवलेल्या बाइकसह रेसिंगमध्ये उतरला आणि जगप्रसिद्ध रेसर बनला. त्यानेच आपल्या प्रसिद्धीचा वापर करून बेनेलीला इटलीचा मोठा आणि विश्वासपात्र ब्रँड म्हणून सादर केले. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, आईच्या बाइकवर मुलगा बनला रेसिंग चॅम्पियन, पारिवारिक वाद...

बातम्या आणखी आहेत...