आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात वाइट देश, नदी-नाले खांगाळून भरत आहेत पोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराकस - एकेकाळी लॅटिन अमेरिकेचा सर्वात समृद्ध देश म्हणून ओळखल्या जाणारा व्हेनेझुएला आता जगातील सर्वात वाइट देशांपैकी एक बनला आहे. येथील लोकांचे इतके हाल झाले, की रोजच्या जेवनाचा खर्च भागवण्यासाठी सुद्धा ते दररोज नदी-नाल्यांची छानणी करतात. त्यातून मिळालेल्या वस्तू विकून ते आपले पोट भरत आहेत. 

 

सरासरी मासिक कमाई फक्त 450 रुपये...
- या देशातील 80% अर्थव्यवस्था कच्च्या तेलावर विसंबून होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्या किमती घसरल्याने अर्थव्यवस्था डबघाईला आली. 2017 च्या शेवटपर्यंत व्हेनेझुएलातील महागाई 2600% वाढली आहे. 
- एका सर्व्हनुसार, देशात दैनंदिन वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे, देशात 75% माणसांचे सरासरी वजन 8.7 किलो इतके कमी झाले आहे. 
- राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देशात किमान मजुरी 40% वाढवली तरीही एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न फक्त 450 रुपये इतके आहे. 
- यानंतर राष्ट्राध्यक्षांनी 200 सुपरमार्केट्सला अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू कमी किमतींमध्ये विकण्याचे आदेश दिले. त्यामुळे, मॉल्सच्या बाहेर मोठ-मोठ्या रांगा लागल्या. तसेच अनेक ठिकाणी हिंसाचार सुद्धा झाले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हेनेझुएलानात नागरिकांच्या हाल-अवस्थेचे आणखी PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...