आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंगटन - पाकिस्तानात सुरू असलेल्या कटकारास्थानांबाबत अमेरिकेने भारताला सतर्क केले आहे. पाकिस्तान नवीन प्रकारचे अण्वस्त्र विकसित करत आहे. त्यामध्ये कमी पल्ल्याच्या शस्त्रांचा समावेश आहे. सोबतच पाकिस्तानचा दहशतवाद्यांना पाठिंबा असून त्या संघटना भारतावर हल्ल्याच्या तयारीत आहेत. असा इशारा देखील अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिला आहे.
पाकचे अण्वस्त्र कारखाने सुरूच...
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजेंसचे संचालक डेन कोट्स यांनी काँग्रेसला ही माहिती दिली आहे. पाकिस्तानात विकसित केल्या जाणाऱ्या अण्वस्त्रांमध्ये कमी पल्ल्याच्या, समुद्र आणि हवेतून मारा करणाऱ्या अण्वस्त्रांचा प्रामुख्याने समावेश आहे.
- जम्मू काश्मीरच्या सुंजवा कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ला झाला असतानाच अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने भारताला सतर्क केले आहे.
- कोट्स यांनी सांगितल्याप्रमाणे, नवीन प्रकारच्या अण्वस्त्र आणि मिसाईलमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सोबतच शस्त्रास्त्र स्पर्धा देखील वाढेल.
उत्तर कोरिया करू शकतो मदत
- कोट्स यांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या काही वर्षात अण्वस्त्रांमुळे उत्तर कोरिया अमेरिकेसाठी घातक देश म्हणून समोर येईल.
- "नॉर्थ कोरियाने इराण आणि सीरियाला बॅलिस्टिक मिसाइल तंत्रज्ञानात एक्सपर्ट केल्याची उदाहरणे आहेत. सीरियात तर उत्तर कोरियाने अणुसंयंत्र बनवण्यासाठी देखील मदत केली. 2017 मध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आणि हायड्रोजन बॉम्बची सुद्धा चाचणी घेतल्याचा दावा करतो."
- "हे तंत्रज्ञान दुसऱ्या देशांमध्ये पोहोचल्यास त्याचे परिणाम काही चांगले नसतील."
पाकिस्तानी दहशतवादी करतील भारतावर हल्ला
- कोट्स यांनी सांगितले, "पाक आर्मी समर्थित दहशतवादी संघटना वेळोवेळी भारतावर हल्ला करत राहतील. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढेल."
- "पाकिस्तान दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थळ आहे. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन कार्यालयांवर हल्ला करणे हे पाकिस्तानचे कट आहे."
- "भारताच्या तुलनेत पाकिस्तान कमकुवत आहे. त्याची सर्वात मोठी चिंता आर्थिक आणि सुरक्षा आहे. अशा परिस्थितीत वेगळा राहून हा देश दुसरा मार्ग अवलंबू शकतो."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.