आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत Beach वर पोलिसांचा अत्याचार, Bikini Girl सोबत केले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत काळ्या लोकांवर पोलिसांकडून होणारा अत्याचार टीकेचा विषय ठरत असताना या पोलिसांचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यू जर्सी येथील एका बीचवर बनवण्यात आला आहे. त्यामध्ये तीन पोलिस एका महिलेला बुक्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये 3 पोलिस   अधिकारी अचानक बीचवर झोपलेल्या 20 वर्षीय एमिलीकडे धावून येतात आणि अचानक तिचे हात पाय धरतात. तिने अटकेचा विरोध केला, तेव्हा एका पोलिसाने तिच्या तोंडावर बुक्या मारल्या. तसेच दुसऱ्यांनी हात-पाय घट्ट धरून तिला बेड्या ठोकल्या.


हा होता तिचा गुन्हा
- न्यू जर्सी येथील बीचवर 3 पोलिस अधिकारी शिस्तीसाठी लावण्यात आले होते. त्याचवेळी त्यांची नजर बिकिनी घातलेल्या 20 वर्षीय एमिलीवर गेली. ती बीचवर लपवून दारू पीत होती. अमेरिकेत समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान बेकायदेशीर आहे. 
- पोलिसांनी वेळीच एमिलीकडे धाव घेतली आणि तिला अटक करण्याचा प्रयत्न केला. एमिलीला काही कळलेच नाही तिने आरडा-ओरड सुरू करून अटकेचा विरोध केला. त्यावर एकाने तिचे हात धरले तर दुसऱ्याने तिचे पाय पकडून तिला ओढले. तिसऱ्याने तिला कथितरीत्या शांत करण्यासाठी तोंडावर पंच मारले. 
- बाजूलाच असलेल्या दुसऱ्या एका तरुणीने हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये प्रत्यक्षदर्शी तिला शांत होण्यासाठी सांगत होते. तर काही अटकेचा विरोध करू नकोस असे ओरडत होते. पण, ती तशीच तडफडत होती आणि पोलिस तिच्यावर बळाचा वापर करत होते. 
- न्यू जर्सी पोलिसांनी त्या तरुणीच्या विरोधात बेकायदेशीर मद्यपान आणि अटकेचा विरोध असे गुन्हे दाखल केले आहेत. तर सोशल मीडियावर वाढत्या संतापानंतर पोलिसांची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आली आहे.  


पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...