आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील सरकारने शनिवारी शट डाऊनची घोषणा केली आहे. वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये प्राथमिक प्रस्तावाला मंजुरीसाठी आवश्यक 60 मते सुद्धा मिळवण्यात ट्रम्प सरकारला अपयश आले. त्यानंतरच सरकारने शट डाऊनची घोषणा केली. त्यातही विशेष म्हणजे, एखाद्या सत्ताधारी पक्षाचे दोन्ही सभागृहांत बहुमत असताना सुद्धा शट डाऊनची नामुष्की ओढावण्याची अमेरिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. तरीही, यामध्ये विरोधी पक्ष डेमोक्रेटिकने राजकारण केल्याचा आरोप सत्ताधारी रिपब्लिकन्सकडून केला जात आहे.
शटडाऊन का?
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने संसदेत मांडलेल्या नवीन बजेटच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. सिनेटमध्ये आवश्यक असलेली 60 मते सुद्धा मिळवण्यात सरकारला अपयश आले आहे.
- सरकारला बजेट मंजुरीसाठी आवश्यक मते मिळाली नसल्यास शटडाऊनची घोषणा करण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच ट्रम्प प्रशासनाने शटडाऊनची घोषणा केली.
- डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण होत असताना त्याच दिवशी शटडाऊनची घोषणा झाली आहे.
काय असतो शटडाऊन?
- अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, शनिवारचे 00.01 वाजताच शटडाऊन लागू होणार आहे. यानंतर सर्व केंद्रीय संस्था, समित्या आणि विभागांचे कामकाज आणि व्यवहार बंद झाले.
- गृहनिर्माण, शिक्षण, वाणिज्य विभागांचे कर्मचारी कार्यालयात कामजासाठी जाणार नाहीत. ते सगळेच शनिवारी घरीच राहतील.
- सरकारी कोषागार, आरोग्य, संरक्षण आणि वाहतुकीचे सुद्धा केवळ निम्मे कर्मचारी कामावर जातील. उर्वरीत निम्म्या कर्मचाऱ्यांना घरीच ठेवले जाणार आहे.
- या निर्णयामुळे आपातकालीन आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कामकाज बंद राहतील. व्हिसा आणि पासपोर्टचे कामकाज सुद्धा मंदावतील.
- तर दुसरीकडे, राष्ट्रीय सुरक्षा, पोस्टल सेवा, एअर ट्रॅफिक कंट्रोल, वैद्यकीय सेवा, आपातकालीन सेवा, वीज सेवा इत्यादी अबाधित सुरू राहतील.
- यापूर्वी बराक ओबामा यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये शटडाऊन घोषित करण्यात आला होता. तो 16 दिवस देशभर लागू होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.