आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Underwearने चेहरा झाकून केली चोरी, CCTVत कैद झाला मजेदार व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्‍सास - अमेरिकेचे टेक्‍सास पोलिस सध्‍या अशा चोराच्‍या शोधात आहे ज्‍याने अंडरवेअरने चेहरा झाकून एका ऑफीसमध्‍ये चोरी केली व नंतर ऑफीसमधील सर्व सामान अस्‍तव्‍यस्‍त केले. 16 जुनरोजी ही चोरी झाली. मात्र अजूनही पोलिस चोराला शोधू न शकल्‍यामुळे त्‍यांनी या चोरीचा सीसीटीव्‍ही फुटेज आपल्‍या फेसबुक पेजवर पोस्‍ट केला आहे. जेणेकरून ज्‍यांना या चोराची माहिती असेल त्‍यांनी पोलिसांना कळवावे. 


चोरी पाहून अनेकांना आवरले नाही हसू 
हे सीसीटीव्‍ही फुटेज काही सेंकदांचेच आहे. यामध्‍ये टेक्‍सासमधील एका ऑफीसमध्‍ये चोर शिरतो. नंतर दिसून येते की त्‍याने आपला चेहरा अंडरवेअरने झाकला आहे. नंतर तो ऑफीसमधील सीसीटीव्‍ही बंद करतो. हा व्हिडिओ पोस्‍ट केल्‍यानंतर अनेकांनी कमेंट सेक्‍शनमध्‍ये या चोराचे अनेक फिंगर प्रिंट्स तुम्‍हाला ऑफीसमध्‍ये मिळतील, असा उलट सल्‍ला पोलिसांना दिला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...