आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फाळ तलावात अशी गोठली मगर, या ट्रिकने वाचवला स्वतःचा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्थ कॅरोलीना - अमेरिकेत लोकच नव्हे, तर जंगली प्राणी सुद्धा जिवघेण्या थंडीचा सामना करत आहेत. नॉर्थ कॅरोलीना येथील एका तलावातील अख्खे पाणी गोठले. यासोबतच, पाण्यात असलेली मगर सुद्ध बर्फात अडकली. या व्हिडिओमध्ये मगर आपले डोके पाण्याबाहेर ठेवून असल्याचे दिसते. डोळे आणि नाक वगळता अख्खी मगर बर्फाच्या पाण्यात अडकली आहे. ओशियन अॅस्ले बीचवरील पार्कच्या कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केला. यात या मगरीने आपला जीव कसा वाचवला हे दिसून येते. 

 

असा वाचवला जीव...
- व्हिडिओवर दिलेल्या माहितीनुसार, ''पाण्यात हँगाउट करताना अॅलिगेटर, याच दात तर पाहा. ही वेळ त्याच्या हँगाउटची आहे. आता तो पाणी गरम होण्याची प्रतीक्षा करत आहे.''
- हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख लोकांनी पाहिला आहे. काहींनी लिहिले, की आम्ही या अॅलिगेटरवर पायी चालू शकतो. 
- त्यावर एक्सपर्टने उत्तर दिले. सध्या ही मगर काही रिअॅक्ट करणार नाही. पाणी जोपर्यंत त्याच्या भोवती गोठलेले असेल तो तसाच धीर धरून राहणार आहे.  
- दुसऱ्या एका तज्ञाने सांगितले, मगर अशा अवस्थेत झटापट करून आपली एनर्जी वाया घालत नाहीत. ते स्थिर-स्थावर राहून आपल्या ऊर्जेचा वापर स्वतःच्या शरीराचे तापमान वाढवण्यासाठी करतात.  
- पाणी गोठत असल्याचा अंदाज लागताच ते पाण्याच्या वर येऊन आपले नाक आणि डोळे हवेत ठेवतात. 
- योग्य वेळ येइपर्यंत ते अशाच अवस्थेत राहतात. अशा अवस्थेत ते कयेक दिवस राहू शकतात. यानंतर बर्फ वितळताच ते मार्ग काढून आपला जीव वाचवतात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...