आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: 45 वर्षांत एक मिनिटही झोपला नाही हा माणूस, दारूसह जगभरातील औषधी बेकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - एखाद्याला एक रात्र नीट झोप आली नाही तर त्याचा दुसरा दिवस आळसात व डुलक्या काढण्यात जातो. मात्र, एक व्यक्ती अशी आहे जी गेल्या 45 वर्षांपासून झोपलीच नाही. 75 वर्षाचे थाय नॉग मागील 45 वर्षांपासून झोपलेच नाहीत. त्याचे झाले असे की, 1973 मध्ये थाय नॉग यांना ताप आला आणि तेव्हापासून त्यांची झोप उडाली. झोपायचा प्रयत्न केला तरी त्याला झोप येत नव्हती. झोप येत नसल्याने त्यांनी त्यावर उपचारही घेतले. पण काही उपयोग नाही. या घटनेमुळे ते दुसऱ्या आजाराने त्रस्त झाले. या आजारातून ते बाहेर पडले. परंतु,  काहीही केल्या त्यांना झोप लागत नाही. आता त्यांनी यावर उपाय काढला आहे. ते रात्री फार्म हाऊसची राखण करतात. त्यांना पत्नी व 6 मुले आहेत.

 

तरीही फिट असल्याचा दावा
थाय यांचे वय 75 वर्षे झाले आहे. तरीही निद्रानाशचा शरीर आणि मेंदूवर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. ते म्हणतात, ''मला जाणलतच नाही की इनसोम्नियाने माझ्या आरोग्यावर काही परिणाम केला आहे. मी एकदम निरोगी आहे. निवांत शेती करू शकतो.'' ते दररोज 4 किमी पायी चालतात आणि डोक्यावर 50 किलो तांदळाचे पोते घेऊन येतात. 


काहीही करून झोप नाहीच...
झोप येत नसल्याने थाय बेचैन झाले नाहीत असे मुळीच नाही. त्यांनी सर्वच उपाय करून पाहिले आहेत. पण, एकही उपाय यशस्वी ठरला नाही. औषधोपचारासह त्यांनी पारंपारिक वनस्पती आणि निसर्गोपचार सुद्धा केले. तरीही एक मिनिट सुद्धा झोप आली नाही. वैतागून दारू देखील पिली, तरीही काहीच नाही. 


डॉक्टर काय म्हणतात?
ऑस्ट्रेलियात स्लीप सर्विसेजचे फिजिशियन डॉ. विकास वाधवा यांनी सांगितल्याप्रमाणे, झोप न लागणे हा थाय यांच्या डोक्यातील एक समज असू शकतो. निद्रानाशची शिकार झालेल्या रुग्णाला आपण झोपलो किंवा कधी जागी झालो हे काहीच कळत नाही. त्यांना झोप आणि जागरणातील फरक करता येत नाही. डॉ. वाधवा यांच्या मते, दीर्घकाळ झोप न लागल्याने मानवी शरीरावर त्याचे वाइट परिणाम होतात. जनावरांचा यात मृत्यू सुद्धा होऊ शकतो. एक मर्यादा ओलांडल्यानंतर माणसाचा सुद्धा मृत्यू शक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...