आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 62 व्या वर्षी तिसरे लग्न करतोय माल्ल्या! ही आहे गर्लफ्रेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - भारतीय बँकांना 9000 कोटींचा गंडा लावून पसार झालेला विजय माल्ल्या वयाच्या 62 व्या वर्षी तिसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. तो आपली लाँग टाइम गर्लफ्रेंड पिंकी लालवानी हिच्यासोबत विवाह करणार अशी चर्चा उडाली आहे. 2016 मध्ये देश सोडून ब्रिटनला पसार होत असताना माल्ल्या आपल्यासोबत पिंकीला देखील घेऊन गेला आहे.

 

कोण आहे पिंकी?
पिंकी लालवानीला माल्ल्याने 2011 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स कंपनीत नोकरी दिली होती. फ्लाइट अटेंडंटची जॉब करत असताना दोघांची मैत्री झाली. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये हे जोडपे एकत्रित दिसायला लागले. काही दिवसांतच लालवाणी किंगफिशरच्या जाहिरातीमध्ये दिसून आली. तिने माल्ल्याच्या अनेक पार्ट्या होस्ट केल्या आहेत. 2016 मध्ये माल्ल्याने भारत सोडून पसार होत असताना तिची साथ सोडली नाही. आपल्यासोबत तो पिंकीला देखील घेऊन गेला. लंडनमध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांत हे दोघे एकत्रित दिसून आले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पिंकी लालवानीचे आणखी काही फोटो...