आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटने कुठल्याही नातेवाइकाला दिले नाही लग्नाचे निमंत्रण, काकूंनी केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या लग्नाच्या वृत्तांमुळे चर्चेत आहेत. विराट आणि अनुष्का आपल्या शेजाऱ्यांना इटलीत लग्नाचे निमंत्रण देत असल्याची चर्चा सुरू असला तरीही विराटने अद्याप आपल्या एकही नातेवाइकाला निमंत्रित केलेले नाही.  मध्यप्रदेशच्या कटनी येथे राहणाऱ्या त्याच्या काकू आशा कोहली यांनी सांगितल्याप्रमाणे, विराटने त्यांना किंवा त्यांच्या कुठल्याही नातेवाइकाला निमंत्रम पाठवलेले नाही. माध्यमांवरच त्याच्या लग्नाच्या चर्चा ऐकत आहोत असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत. 
 
माध्यमांच्या वृत्तानुसार, हे दोघे इटलीत गुपचूप विवाह करण्याच्या तयारीत आहेत. त्याच तयाऱ्या करण्यासाठी विराट आधीच इटलीत पोहोचला आहे. तर अनुष्का शर्मा नंतर कुटुंबियांसह इटलीला रवाना झाली आहे. विराटने मोजक्या कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींनाच आमंत्रित केल्याचे सांगितले जात आहे. 
 
आणखी काय म्हणाल्या काकू...
> कोहलीच्या काकू कटनीच्या माजी महापौर आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, विराटने अद्याप त्यांना लग्नासाठी निमंत्रण पाठवलेले नाही. तरीही, ते "एकत्रित खूप सुंदर दिसतात. आमच्या शुभेच्छा सदैव त्यांच्यासोबत राहतील." 
> विराट आणि माझा मुलगा एकाच वयाचे आहेत. विराटच्या आई आणि आमचे नेहमी फोनवर बोलणे होते. विराट जेथे राहील तेथे खुश राहावा अशीच आमची अपेक्षा. अनुष्का आमच्या कुटुंबातील सून होत असेल तर खूपच चांगले.
 
 
विराटचे एमपी कनेक्शन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दिल्ली नाही, तर मूळचा मध्यप्रदेशचा आहे. फाळणीच्या वेळी विराटचे आजोबा पाकिस्तानातून कटनी येथे शिफ्ट झाले. यानंतर कामानिमित्त विराटचे वडील दिल्लीत राहायला गेले. तरी आजही विराटचे काका आणि काकूंसह मोठा कुटुंब कटनी येथेच राहतो. 2005 मध्ये विराट आपल्या चुलत भावाच्या निधनानंतर कटनी गेला होता. तेव्हापासून तो कटनीला एकदाही गेलेला नाही. विराटच्या काकू माजी महापौर असून विराटचे चुलत भाऊ आणि वहिणी सुद्धा राजकारणात सक्रीय आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, विराटच्या फॅमिलीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...