आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेपटाऊन- दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात केवळ ९५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्यासाठी आणीबाणीसारखी परिस्थिती अनुभवणारे हे जगातील पहिलेच शहर असावे. शहराचे मोठे सहा जलप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत किंवा काही त्या मार्गावर आहेत. सर्व धरणांमधील पाणीसाठा ३३ टक्के राहिला आहे. केपटाऊनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कमी पाऊस झाला आहे. पाणीपातळी २१ एप्रिलपर्यंत १३.५ टक्क्यांखाली जाण्याची भीती आहे. केपटाऊन प्रशासनाने या दिवशी डे-झीरो जाहीर केले आहे. निर्जळीनंतर लोकांच्या घराचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार आहे. त्यासाठी शहरात २०० केंद्रे तयार केली जाणार आहेत. प्रशासनाच्या वतीने याबाबत जनजागृती केली जात आहे. केपटाऊनच्या विमानतळावर ‘पाण्याच्या एका थेंबाचादेखील अपव्यय होऊ देऊ नका.’ असे पोस्टरद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
थीवॉटरक्लूफ धरण
थीवॉटरक्लूफ हे केपटाऊनमधील सर्वात मोठे धरण आहे. शहराला ४१ टक्के पाण्याचा पुरवठा या धरणातून होतो. धरणाची एकूण क्षमता ४८ लाख कोटी घनमीटर आहे. दररोज शहराला धरणातून ६० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणाचे क्षेत्रफळ चौरस एक किमी एवढे आहे. शहरासाठी ६ धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. २०१७ मध्ये त्याच्या पाणीपातळीत १२.५ टक्क्यांनी घट झाली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, निर्जळीच्या दिवशी २७ लिटर मिळणार...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.