आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षीय मुलीसोबत करत होता विवाह; फोटाग्राफरने पाहताच केली धुलाई, सोशल मीडियावर बनला Hero

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकारा - तुर्कीत एका 15 वर्षीय मुलीच्या लग्नात पोहोचलेला फोटोग्राफर सोशल मीडियावर हिरो ठरवला जात आहे. फोटोग्राफर ओनुर अल्बायराक याला एका लग्नात फोटोग्राफीसाठी बोलावले होते. त्या लग्नात वधू अतिशय घाबरलेली दिसून आली. चौकशी केली तेव्हा त्या मुलीचे वय फक्त 15 वर्षे असल्याचे त्याला समजले. यानंतर ओनुरने फोटोग्राफी करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर नवरदेव भडकला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. नवरदेवावर आधीच चिडलेल्या ओनुरने त्याचे नाक फोडले. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल करण्यात आला. लोक तो शेअर करताना ओनुरला हिरो म्हणत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी आपल्याला फोटोग्राफीचे कंत्राट मिळाले तेव्हा वधूचे वय माहिती नव्हते असे ओनुरने सांगितले आहे. 


तुर्कीतही विवाहासाठी किमान 18 वर्षे आवश्यक
तुर्कीत मुलींच्या लग्नाचे वय किमान 18 वर्षे निश्चित आहे. अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींसोबत विवाहाची प्रकरणे समोर येतात. येथील अनेक सामाजिक संघटना बालविवाह रोखण्यासाठी काम करत आहेत. दरम्यान, ओनुरचे देशभर कौतुक केले जात आहे. सोबतच त्याच्या सहकारी फोटोग्राफर्सने सुद्धा ज्या-ज्या ठिकाणी बालविवाह होईल त्या-त्या ठिकाणी काम करणार नसल्याचा संकल्प घेतला आहे. तुर्कीच्या शेकडो फोटोग्राफर्स आणि फोटोग्राफर संघटना समोर येऊन हा संकल्प घेत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...