आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात बोलवू नका असले फोटोग्राफर, आयुष्यभर लपवावे लागतील अल्बम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात एकदाच येणारा क्षण अर्थातच लग्नाचे मोमेंट कुणीही विसरू शकत नाही. अशात त्या क्षणांचे विशेष फोटो अल्बम करणे जणू परमपराच बनली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात वेडिंग फोटोग्राफीचे चलन आहे. लग्नाचे किस्से निघताच लोक आपला वेडिंग अल्बम पाहून आणि मित्र-परिवाराला दाखवून आठवणी ताज्या करतात. पण, असेही काही कपल आहेत ज्यांना आपल्या लग्नाचा अल्बम कुठे तरी लपवून ठेवावा लागतो. कुणी पाहिल्यास आपली मस्करी करतील असे त्यांना वाटते. कारण आहे, त्यांचा क्रिएटिव्ह फोटोग्राफर. डिजिटल फोटो, डिजिटल अल्बम आणि एडिटिंगने किंवा कथित क्रिएटिव्हिटी दाखवून काही फोटोग्राफर वेडिंग अल्बमचे वाटोळे करतात. रशियात अशाच काही मोजक्या लग्नाचे अल्बम आणि त्यातील काही दुर्मिळ फोटो बोअर्ड पांडा या संकेतस्थळावर पोस्ट करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरून घेण्यात आलेल्या या फोटोंना पाहून आपले हसू आवरणार नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...