आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये श्वेत वर्णियांकडून अश्वेतांवर होणारे वर्णद्वेषी हल्ले नेहमीच चर्चेत राहतात. गोऱ्यांच्या देशांमध्ये काळ्यांसोबत भेदभाव केला जातो अशी अनेक उदाहरणे आहेत. पण, काळ्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेत याचे उलटे चित्र दिसून येते. येथे काळ्या लोकांकडून गोरे नागरिक आणि शेतकऱ्यांवर हल्ले केले जातात. गेल्या वर्षभरात अशा 400 हल्ल्यांची नोंद झाली आहे.
हे आहे कारण...
सरकारने गोऱ्या लोकांनी काळ्यांच्या घेतलेल्या जमीनी मोफत परत करण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हापासून अशा घटनांमध्ये वाढ झाली. नेल्सन मंडेला यांची जन्मभूमी आणि महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेने वर्णद्वेष नष्ट करण्यासाठी जगव्यापी आंदोलन पाहिले. तरीही या देशात वर्णद्वेषी घटना पूर्णपणे संपलेल्या नाहीत. फरक इतकाच की तेव्हा गोऱ्यांकडून काळ्यांसोबत भेदभाव केला जायचा आणि आज काळ्यांकडून गोऱ्यांसोबत भेदभाव केला जात आहे. सरकारने सर्वच योजना काळ्यांसाठी आणल्या. त्यांना नोकरी आणि उद्योगात जास्तीत जास्त प्राधान्य देण्याकडे लक्ष घातले. परिणामी, श्वेतवर्णीय सुविधा आणि मुख्य प्रवाहापासून वंचित झाले.
अशा अवस्थेत जगतात गोरे
- दक्षिण आफ्रिकेत कित्येक दशकांपासून सुरू असलेल्या अश्वेत समर्थक आंदोलनांमुळे त्यांच्या आयुष्यात मोलाचे बदल घडून आले. पण, श्वेत वर्णीयांवर त्याचा विपरीत परिणाम झाला.
- गाउंतेंज प्रांतातील मुन्सीव्हिले शहरात सर्वाधिक श्वेतवर्णीय गरीबीला सामोरे जात आहेत. येथे 300 हून अधिक कुटुंबीय अवैधरीत्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.
- दक्षिण आफ्रिकेत आजही अनेक मोठ्या पदांवर श्वेतवर्णीय आहेत. त्यांना नोकरी आणि उद्योग सुद्धा आहेत. तरीही गेल्या काही वर्षांत श्वेतवर्णीयांमध्ये गरीबीचे प्रमाण वाढले आहे.
- व्हाइट स्लम्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न 3000 रुपयांपेक्षा कमी आहे. नवीन कायद्यामुळे खरेदी केलेल्या जमीनी फुकटात गेल्याने ते तंबूंमध्ये राहत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गोऱ्या लोकांची झोपडपट्टी आणि आफ्रिकेत त्यांचे आयुष्य...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.