आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात फेकून दिले जाणारे कोंबड्यांचे पंजे यामुळे खातात चिनी, कोरियन!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - भारतात मांसाहारामध्ये चिकनची व्यंजने सर्वात लोकप्रीय आहेत. पण, चिकनच्या कुठल्याही डिशमध्ये अगदी चिकन तंगडी कबाबमध्ये सुद्धा कोंबड्यांचे पंजे वापरले जात नाहीत. बऱ्याच चिकनशॉपमध्ये किंवा घरात सुद्धा चिकन कापताना त्याचे पंजे फेकून दिले जातात. परंतु, चीन आणि कोरियासह काही आशियाई देशांमध्ये हेच पंजे अगदी चवीने खाल्ले जातात. कधी विचार केलाय की याचे कारण काय असेल? तेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.


कोरियन, चिनी तरुणींच्या स्किनचे रहस्य हेच...
- कोरियन आणि चिनी महिला तसेच पुरुष आपल्या चिरतरुण स्किनमुळे जगभरात ओळखले जातात. तेथे अगदी वयाच्या चाळीशीत असलेल्या महिला सुद्धा विशीतील तरुणींना मात देतात. त्यांच्या हेल्थी आणि चिरतरुण अशा स्किनचे रहस्य याच कोंबड्यांच्या पंजांमध्ये दडले आहे.
- कोंबड्यांच्या पंजांमध्ये कोलेजन नावाचा एक पोषक घटक असतो. हाच घटक स्किन चिरतरुण आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वात पोषक आहे. चीनच्या कुठल्याही हॉटेल आणि स्टॉलवर आपल्याला या पंजांपासून तयार केलेल्या विविध प्रकारच्या चविष्ट डिश पहायला मिळतील.
- कोंबड्यांच्या पंजांमध्ये कोलेजन हा पोषक तत्व असल्याचे संशोधनात सुद्धा स्पष्ट झाले आहे. तैवानच्या नॅशनल चुंग-ह्सिंग विद्यापीठात अॅनिमल सायन्स विभागाच्या संशोधकांनी हे संशोधनासह स्पष्ट केले आहे. कोलेजनमुळे त्वचा चिरतरुण आणि निरोगी राहते असा निष्कर्श सुद्धा त्यांनी काढला आहे. आहारात कोलेजन असल्यास वयानुसार पडणाऱ्या सुरकुत्या सुद्धा कमी होतात.
- चीन, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, मलेशिया, सिंगापूर फिलिपाइन्स, थायलंड तसेच इतर काही देशांमध्ये सहज उपलब्ध होणारे कोंबडीचे पंजे प्रत्यक्षात एक्सपोर्टही मोठ्या प्रमाणात केले जातात. 
- भारतासह अनेक देशांमध्ये कोंबड्यांचे फक्त मांस खाल्ले जाते. त्यामुळे, भारत, युरोपियन खंड आणि अरबी राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चिकनचे डीलर हे पंजे कचऱ्यात न फेकता चीन, कोरियन देश, फिलिपाईन्स, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा देशांना एक्सपोर्ट करतात.

 

बातम्या आणखी आहेत...