आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत महिलेने तरुणाला भर रस्त्यावर धुतले, एवढीच होती चूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियात सध्या बदलांची श्रंखला सुरू आहे. याच देशातील महिलेचे एका तरुणाला मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तिने आपली छेड काढणाऱ्या तरुणाला भर रस्त्यावर काठीने धुवून काढले. तो कथितरीत्या त्या महिलेच्या कपड्यांवरून तिची छेड काढत होता. या महिलेने केलेल्या कारवाईवर सोशल मीडियावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

 

- माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना रियाधच्या एका पार्कमध्ये घडली आहे. तेथील काही युवकांनी महिलेचे केस झाकलेले नसल्याने तिच्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
- त्याचेच प्रत्युत्तर देताना या महिलेने चक्क काठी उचलली आणि त्या तरुणांची धुलाई सुरू केली. यानंतर त्या युवकांना घटनास्थळावरून पळून जाणेच योग्य वाटले. 
- हा व्हिडिओ पाहून अनेक जण महिलेच्या धाडस आणि छेडछाड विरोधात केलेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत. तर काही लोक तिच्यावर पुरुषांना उत्तेजित करण्याचे आरोप लावत आहेत. काहींनी तिला वंडर वुमन असे नाव देखील दिले. 
- ही महिला काही सामान्य महिला नसून एक सोशल मीडिया स्टार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ते युवक या महिलेचे पाठलाग करत होते. तिचे फोटो काढण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. सोबतच तिची छेड काढली, यावर ती भडकली होती. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...