आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूत बंगल्यासमोर आईने टिपला धक्कादायक PHOTO; हे सत्य आले समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने टिपलेला तो फोटो आणि लाल सर्कलमध्ये कथित भूत. - Divya Marathi
महिलेने टिपलेला तो फोटो आणि लाल सर्कलमध्ये कथित भूत.

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनच्या डेव्होनशायर प्रांतात एका आईने आपल्या मुलासह भूताला कॅमेऱ्यात कैद केल्याचा दावा केला. तिने यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट केले. या दृश्यांनी अख्ख्या ब्रिटनमध्ये खळबळ उडाली होती. काहींनी त्या व्हिडिओवर संशय व्यक्त केला. परंतु, तो खरा मानणाऱ्यांची संख्या त्याहून अधिक होती. तो भूत नेमका कोण होता हे आता समोर आले आहे. 


नेमके काय घडले..?
- इंग्लंडच्या डेव्होन काउंटीमध्ये राहणाऱ्या लुइस लेन्टन 41 आपल्या 5 वर्षीय मुलाला बाहेर घेऊन खेळत होत्या. आपला मुलगा सायकल चालवत असताना त्या त्याचे फोटो आणि व्हिडिओ तयार करत होत्या. तिचा चिमुकला एका भूत बंगल्यासमोर सायकल चालवतोय हे तिला माहितीच नव्हते. काढलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून तिला धक्काच बसला.
- तिने आपल्या मुलाच्या सायकलिंगचे फोटो टिपले होते. परंतु, ज्या बंगल्यासमोर ती फोटो काढत होती त्याच्या गॅलरीमध्ये एक संशयास्पद छवी टिपली. कित्येक वर्षांपासून रिकामा पडलेल्या आणि कुणीच जाण्याची हिंमत करत नसलेल्या बंगल्यात ही छवी धक्कादायक होती. त्यांच्यासह सर्वांनीच तो फोटो आणि व्हिडिओ भूताचा असल्याचे मान्य केले. 
- ही घटना परिसरात आगीसारखी पसरली आणि स्थानिक प्रशासनाला समोर येऊन प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. त्यांनी महिलेचा दावा फेटाळून लावला. तसेच तो कदाचित एक गार्ड असावा आणि फोटो काढताना तो बंगल्यात असेल असा निष्कर्श काढला. परंतु, महिला आपल्या दाव्यावर ठाम होती आपण त्या ठिकाणी भूत पाहिला असे तिने सांगितले. 


भूतानेच सांगितले सत्य...
- यानंतर जे काही घडले ते धक्कादायक होते. महिलेने ज्या फोटोमध्ये भूत असल्याचा दावा केला होता तोच समोर आला. अॅलेक्स वॉरन असे त्याचे नाव असून तो त्याच कुप्रसिद्ध बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. महिला फोटो काढत होती, तेव्हा आपणच गॅलरीत थांबलो होतो असे त्याने स्पष्ट केले. 
- अॅलेक्स पुढे म्हणाला, लोकांनी बंगल्याविषयी जे काही पसरवले आहे ते सर्रास खोटे आहे. आपण स्वतः या बंगल्यात दिवस-रात्र पहारा देतो. कुणाला भूत दिसणार असला तरी तो सर्वप्रथम मला दिसला असता. ती महिला आणि तिचा मुलगा परिसरात खेळत होते. पण, तो लहान मुलगा असल्याने त्याला मी काहीही बोलण्यास टाळले असेही तो पुढे म्हणाला. एवढेच नव्हे, तर आपला सहकारी आणि आपण सुद्धा आप-आपल्या मुलांना खेळवण्यासाठी या परिसरात आणतो असे त्याने स्पष्ट केले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...