आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींनी अब्जाधीशांना कसे आकर्षित करावे, ही महिला क्लास घेऊन देते धडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅंकॉक - थायलंडची प्रेया सुरियाने एक-दोन नव्हे तर तब्बल 5000 लोकांसोबत डेट केले आहे. आता स्थिती ही आहे की, ती महिलांसाठी डेटिंग गुरु बनली आहे. ती आपल्य पॉपुलर फेसबुक पेजद्वारे तरुणींनी अब्जाधीश किंवा धनाढ्य पुरुषांना कसे आकर्षित करावे याचे धडे देते. प्रेयाला लोक मॅडम राया नावानेही ओळखतात. मात्र, काही लोक सुरियावर प्रॉस्टिट्यूशनला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे.


सर्वात महाग कोर्सची फी 26 हजार रूपये...
- 24 वर्षाची सुरियाचे अनेक ऑनलाईन कोर्सेजची सीरीज आहे, ज्यात परफेक्ट शुगर डॅडी देण्याची शंभर टक्के खात्री दिली जाते. 
- यासोबतच या कोर्समध्ये शिकवले जाते की, शुगर डॅडीकडून मोठी रक्कम व महागडी गिफ्ट कशी मिळवावीत. 
- यातील सर्वात महागडा ट्रेनिंग कोर्स वीआयपी प्रोग्रॅम आहे. सुरियाच्या या प्लॅनसाठी पात्र ठरण्यासाठी एक्सक्लूसिव क्लबचे मेंबर बनावे लागते व त्याची फी 26 हजार रुपये आहे. 
- वीआयपी प्लॅनची सर्वात खास बाब म्हणजे ही की, एक्सपर्टकडून उर्वरित ट्रेनिंग देण्याबरोबरच संबंधित तरूणीची श्रीमंत ग्राहकांशी भेट करून दिली जाते. 
- ज्या महिला या प्लॅन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी एक स्टॅंडर्ड प्लॅन सुद्धा आहे. त्याची किंमत 12 हजार रुपये आहे. यात श्रीमंत पुरुषांना कसे आकर्षित केले जाते याचे ट्रेनिंग दिले जाते. 
- सुरियाने थाय सरकारच्या स्कॉलरशिप मिळवून यूरोपात शिकून आली आहे. तेथे तिला अनेक यशस्वी लोकांसमवेत डेट करण्याची संधी मिळाली आणि तिने ही कला शिकली. 
- प्रेयाने यूरोपातून थायलंडमध्ये परतल्यानंतर थाय महिलांच्या मदतीसाठी आपला ऑनलाईन प्रोजेक्ट सुरु केला.


प्रॉस्टिट्यूशनचा झाला आरोप
सुरियाने नुकतीच एक घोषणा केली की, तिला काही लोकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यावर प्रॉस्टीट्यूशन आणि थाय महिलांना चुकीची नावे देण्याचा आरोप झाला आहे. मात्र, तिच्या पेजवर येणारे बहुतेक फीडबॅक पॉजिटिव आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅडम रायाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...