आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप, मगरींना अंगा-खांद्यावर खेळवणारी तरुणी; मगरींसोबत कुस्तीसाठी प्रसिद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - न्यूयार्कमध्ये असलेली सामान्य जॉब सोडून गॅबी कॅम्पोन या तरुणीने काही अॅडव्हेंचरस करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच परिणाम म्हणून तिने अॅलिगेटर रेसलिंगचा अर्थात मगरींसोबत कुस्तीचा करिअर निवडला आहे. गॅबी मगरींसोबत रेसलिंग आणि त्यांना किस करून खेळत राहते. तिचा हा शो पाहण्यासाठी लोक प्राणी संग्रहालयात तिकीट घेतात. त्यातही गॅबी आपल्या मगर, साप, कासव, सरडे आणि असंख्य प्राण्यांसोबतचे फोटोज आणि सेल्फीज इंस्टाग्रामवर पोस्ट करते. तिच्या याच फोटोजमुळे ती आता इंस्टाग्राम स्टार बनली आहे. इंस्टाग्रामवर तिचे हजारो चाहते आहेत.

 

>> एवरग्लेड्स हॉलिडे पार्कमध्ये स्वयंसेवी असलेली गॅबी दररोज शेकडो लोकांसमोर अॅलिगेटर रेसलिंगचा शो सादर करते. यात ती मगरींसोबत नाट्यमय फाइट करते.
>> गॅबी मगरींच्या पाठीवर बसून आणि तोंड वर उचलून आपल्या हनुवटीने धरते. यासोबतच ती मगरींना किस देखील करते. हे सर्व फोटोज ती इंस्टाग्रामवर पोस्ट करून ऑनलाईन स्टार बनली आहे.
>> अमेरिकेत लोकांच्या घरातील स्वीमिंग पूल आणि गोल्फ कोर्ससह मोकळ्या पटांगणात मगरी सापडतात. अशात गॅबी आणि तिच्यासारख्या स्वयंसेवींना फोन करून बोलावले जाते. यानंतर स्वयंसेवी त्या मगरींना प्राणी संग्राहलयात ठेवून त्यांची देखरेख करतात. 
>> मगरींच्या कातडीला बाजारात खूप मागणी आहे. अशात अनेकवेळा लोक आपल्या घरात सापडणाऱ्या मगरींचा शिकार करून त्यांची कातडी काळ्या बाजारात विकतात. मगर, साप आणि इतर असंख्य प्राण्यांना संरक्षण देण्यासाठीच आपण नोकरी सोडली असे गॅबी म्हणते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, गॅबीचे मगर आणि इतर प्राण्यांसोबतचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...