आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटेपणा रोज 15 सिगारेट ओढण्याइतके घातक, ब्रिटनमध्ये पहिली Loneliness Ministry

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगात प्रथमच एकटे राहणाऱ्या लोकांच्या हितासाठी विशेष मंत्रालय स्थापित करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये तयार झालेल्या या मंत्रालयाची जबाबदारी 42 वर्षीय ट्रेसी क्राउच यांना देण्यात आली आहे. ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपैकी 14% लोक (90 लाख) एकटेपणाला बळी ठरले आहेत. एकटेपणा रोज 15 सिगारेट ओढण्याइतके घातक आहे असे मानले जाते. या विशेष विभागाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मंत्री ट्रेसी यांचे ई-मेल अकाउंट चौकशींनी भरले आहे. त्यांचा फोन सलग दिवसभर रिंग होत असतो. त्यांची भेट घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.


मंत्रालयाबद्दल अनेक देशांना उत्सुकता
ब्रिटनच्या खासदार जो. कॉक्स यांनी एकदा एकटेपणाशी संबंधित संशोधन जारी केले होते. याच रिसर्चने ब्रिटिश सरकारला एकटेपणा संदर्भात विशेष मंत्रालय स्थापित करण्यास प्रेरित केले. कॉक्स यांचा 2016 मध्ये युनायटेड किंगडम ब्रेक्झिट जनमत चाचणी दरम्यान खून करण्यात आला. ट्रेसी यांनी हे मंत्रालय सांभाळले तेव्हापासून विविध देशांचे सरकार, मंत्री आणि प्रतिनिधी या मंत्रालयाचे कामकाज समजून घेण्यासाठी तसेच अभ्यास करण्यासाठी ब्रिटनला येत आहेत. त्यामध्ये नॉर्वे, डेनमार्क, कॅनडा, यूएई, स्वीडन, आईसलंड, न्यूझीलंड, जपान आणि जर्मनी इत्यादी देशांचा समावेश आहे. 


एकटेपणाचे कारण आणि तोडगाही सोशल मीडिया!
ब्रिटनच्या मंत्री ट्रेसी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यूकेमध्ये 16 से 24 वर्षे वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक एकटेपणा जाणवतो. त्यांच्या एकटेपणाला सर्वात मोठे कारण सोशल मीडिया आहे. डिजिटल माध्यमांची सवय असलेली नवीन पिढी एकटेपणाला सामोरे जात आहे. इंस्टाग्राम आणि फेसबूकवर शेकडो मित्र हेच आपले खरे मित्र असल्याचा गैरसमज लोकांना झाला आहे. सोशल मीडिया जसे या समस्येला कारण आहे, तसेच या समस्येवर तोडगा सुद्धा ठरू शकतात. वयोवृद्ध आणि एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सोशल मीडियाचा वापर शिकवून जगभरातील लोकांच्या संपर्कात आणले जाऊ शकते. 


उशीरा लग्न एकटेपणाला कारणीभूत
ट्रेसी सांगतात, एकटेपणाचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे, उशीरा लग्न होणे होय. यूरोपियन यूनियनच्या सदस्य देशांमध्ये सर्वाधिक सिंग लोक पाहायला मिळतात. कमी उत्पन्न असलेल्या लोकांचे एकटेपण दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मदत केंद्र उघडण्यात आले आहेत. रेडिओक्लब आणि सीनिअर सिटिझनचे फोन नंबर घेऊन त्यांच्याशी रोज संवाद साधले जात आहे. लोनलीनेस मंत्रालयाने यासाठी आतापर्यंत 182 कोटी रुपये खर्च केले आहेत. 


मंत्र्यांना आलेले ई-मेल...
1) 30 वर्षीय तरुणीने मंत्री ट्रेसी यांना फोन करून आपली समस्या मांडली. ती नोकरी शोधण्यासाठी लंडनला आली होती. नोकरी मिळाली सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु, ती आता खूपच एकाकी फील करत आहे. सकाळी उठून तयार होणे आणि कामावर जाणे तसेच घरी परतण्यापर्यंत ती एकटीच राहते. तिचे मित्र आणि कुटुंबीय शहरापासून खूप दूर आहेत. लंडनसारख्या शहरातही आपण खूप एकटे आहोत कारण, आपल्याला क्लब आणि बारमध्ये जाणे सुद्धा आवडत नाही असे तिने म्हटले आहे. 

2) एका वृद्धाने लिहिल्याप्रमाणे, ते कित्येक दशकांपासून आपल्या पत्नीची काळजी घेणारे एकमेव व्यक्ती होते. परंतु, काही वर्षांपूर्वीच पत्नी जग सोडून गेली. सध्या ते खूपच एकटे आहेत. त्यामुळे, या मंत्रालयाच्या कामकाजात आणि मोहिमेत हातभार लावू इच्छित आहेत. 


एकटेपणा एक गंभीर आजार
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, एकटेपणा आरोग्यासाठी रोज 15 सिगारेट ओढणे इतकेच घातक आहे. माणसाला हृदयविकार आणि मधुमेह नाही तर एकटेपणा हा सर्वात गंभीर आजार आहे. अमेरिकेत एकटेपणा एक रोगराई बनले आहे. अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी 46% लोकांनी नेहमीच एकटेपणा वाटत असल्याची तक्रार केली आहे. 18 ते 22 वर्षे वयोगटातील नागरिकांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. तेथे वृद्धांचा याच एकटेपणामुळे मृत्यू होत आहे. अमेरिकेत या रोहाला कोडोकुशी असे म्हटले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...